Gadgebabab : बाबा, आम्हाला माफ करा. !
पुजनीय बाबा,पुजनीय हे विशेषण तुमच्या विचारात बसणारे नाही व तुम्हाला आवडणारेही नाही याची आम्हाला पुरेपुर जाणीव आहे.परंतु ज्यांना पुजनीय म्हणावे आणि मानावे अशी माणसे सध्या शोधूनही सापडत नाही.त्यामुळे तुमच्या नावालाच ते विशेषण शोभून दिसते.क्षमा असावी.बाबा, विषय फार गंभीर आहे.म्हणून तुमच्यासोबत बोलण्याची इच्छा झाली.कदाचित तुमच्या दृष्टीने ती एक दुर्लक्षित करण्याजोगी घटना असेल.परंतु ज्या माणसाने या महाराष्ट्राच्या मातीला वैचारिकदृष्ट्या सुपीक बनविण्यासाठी स्वतःच्या शरीराची माती केली, त्या गाडगेबाबांच्या संदर्भात ही संतापजनक घटना घडली म्हणून बोलत आहे. महाराष्ट्र ही संत विचारांची पवित्र भूमी म्हणून आम्ही नेहमी फुशारकी मारत असतो.परंतु या महाराष्ट्रातच संतविचारांना वेळोवेळी पायदळी तुडविण्याचे घृणास्पद प्रकार घडत आहे.आताही तुमची समाजसेवी व समाजमान्य विचारांची *दशसूत्री* मंत्रालयाच्या प्रवेशद्वार...