Rashtrasant : गुरुकुंज व ग्रामगीता
'सबके लिये खुला है,मंदीर यह हमारा' व 'विश्व स्नेहका ध्यान धरे,सबका सब सम्मान करे',गुरुकुंजाच्या महाद्वारावरील हे बोधवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेते.गुरुकुंज आश्रमाची निर्मीतीच मूळात अशा बोधभावनेतून जगदोद्धाराकरिता वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ह्यांनी करुन ठेवलेली आहे.तिथे आलेल्या प्रत्येकालाच काही ना काही स्फूर्ती आश्रमातल्या आतील प्रत्येक द्वारावर लिहिलेल्या बोधवाक्यातून मिळत असते.१९३५ साली एका झोपडीतून निर्माण झालेल्या या आश्रमाचे आता वटवृक्षात रुपांतर झालेले आहे.गुरुकुंज हा नुसता आश्रम नसून ते 'मानवतेचे विद्यापीठ' ठरावे.तेथील प्रार्थना मंदिरातील सिंहासनावर कोणत्याही देवी-देवतांची मूर्ती विराजमान नसून सर्वधर्मसमभावाचे जगातील हे एकमेव मंदीर ठरावे.तेथील गाभाऱ्यात बसून कोणत्याही देशातील,धर्मातील मुमुक्षुला आपल्या अंतस्थ असलेल्या भावाने ध्यान,प्रार्थना करता येते.लौकिकार्थाने गुरुकुंज हा ...
