खरे वारकरी…
वारकरी धर्म हा महाराष्ट्राच्या मातीतील अत्यंत लोकप्रिय धर्म आहे.आमच्या संतांनी वारकरी धर्माची पताका संपूर्ण देशभरात पोहचवली आहे.संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,सावता महाराज, संत गोरा महाराज,सेना महाराज,जगनाडे महाराज यासारख्या अनेक संतांनी १३ व्या शतकापासून तर आधुनिक काळामधे संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्व संतांनी वारकरी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे.या संतांनी आपापल्या कालखंडात आपल्या भजन,कीर्तन,प्रवचन आणि साहित्यातून लोकांचे खरे प्रबोधन केले.लोकांना भक्तीचा खरा मार्ग समजून सांगितला.देव कुठे आहे आणि खरी देवाची भक्ती कशात आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने आमच्या संतांनी येथील कष्टकरी,कामकरी, शेतकरी वर्गाला समजावून सांगितले. विठ्ठल हे समस्त बहुजन समाजाचे दैवत आहे.या विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून आमच्या अनेक संतांनी बहुजन समाजाची वैचारिकदृष्ट्या नांगरणी आणि वखरणी केल...