मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!
मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!
या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक 'सजीवाला' भयमुक्त जगण्याचा 'अधिकार'आहे. असा कोणता 'जीव' आहे की,ज्याला जगावसं वाटत नाही..? ज्यांना भावना आहेत, सुखदुःखाच्या संवेदना आहेत, त्या सर्व जीवाला कधीच 'मरावसं' वाटत नाही तर अधिका अधिक जगावसं वाटतं. हे 'जगणं- मरण' नैसर्गिक असतं. कधी ते देहामध्ये आलेल्या सयंत्र बिघाडा मुळे 'तग' धरू शकत नाही. म्हणून कुणाला निर्धारित वेळेपेक्षा 'आधी' जावं लागतं. ही वेळ कुणाच्या आयुष्यात 'कधी' येईल सांगता येत नाही. कधी तर जन्म घेतानांच कुणाकुणाच्या वाट्याला आधीच जाणं येतं. तर कुणी शंभरापेक्षाही जास्त वर्ष जगतं. दगडावर आपटून सुद्धा त्याला मरण येत नाही. अशी ही देहयष्टी आणि काळाची महिमा आहे. जन्म- मरण हे 'निसर्गदत्त' आहे. कुणी कुणाचं 'जगणं' कुणी मग का म्हणून हिसकावून घ्यावं ? का कुणाच्या जगण्याला खंडित करावं? कुणाच्या जीवनामध्ये अडथळा ...


