Sunday, March 8

Article

रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल का लिहिले असावे ?
Article

रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल का लिहिले असावे ?

रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल का लिहिले असावे ?जर कुठल्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल लिहिले असेल तर त्याचा अर्थ तिथून पुढे ट्रॅक नाही. म्हणजे रेल्वे ज्या दिशेने आली त्याच दिशेने परत जाणार. टर्मिनसला टर्मिनल पण म्हटले जाते. म्हणजे असे स्टेशन जिथून रेल्वे पुढे न जाता आली त्याच दिशेने परत जाते, आपल्या माहितीसाठी देशात सध्या 27 स्टेशनवर टर्मिनल लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हे देशातील सगळ्यात मोठे टर्मिनल आहेत.हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र  * रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते सेंट्रल?स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असले तर त्या शहरात एक पेक्षा अधिक स्टेशन आहेत, ज्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असते ते त्या शहरातील सगळ्य...
समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतीबा फुले यांचे लेखन कार्य 
Article

समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतीबा फुले यांचे लेखन कार्य 

समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतीबा फुले यांचे लेखन कार्य समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राजे सयाजीराव गायकवाड, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आणि एकूणच आपण जेव्हा समाजअग्रणीचा बिचार करतो तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव घेणे व त्यांच्याविषयी जाणून घेणे हे क्रमप्राप्तच ठरते.भारत देश हा वर्णव्यवस्था, चातुर्वर्ण समाजधिष्ठीत व्यवस्थेचा गुलाम झाला होता आणि त्यामध्ये असणारी जातीयतेची उतरंड यामध्ये खालच्या जातीतून वरच्या जातीत जाण्याची कोणतीच सोय नव्हती. हा देश संपूर्णत: वर्णवादाच्या, वर्णभेदाच्या चौकटीत विलीन झाला होता. या वर्णवादी उतरंडेत अस्पृश्य, स्पृश्य यांच्यात वर्तणूक, चालीरिती, अपमानित करणारी, पदोपदी छळणारी ही अमानवीय वागणूक दिल्या जात...
स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक  महात्मा ज्योतिबा फुले
Article

स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले

स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक  महात्मा ज्योतिबा फुलेविद्येविना मति गेली | मतिविना निती गेली|| नितीविना गति गेली | गतिविना वित्त गेले|| वित्तविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||समाजातील माणसाजवळ जर ,शिक्षण नसेल.तर, त्या माणसाची काय अवस्था होत असते.याचं मार्मिक सत्य ज्योतिबांनी समाजास सांगितलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिकलं पाहिजे.हा महात्मा फुलेंचा ध्यास होता. आणि यासाठीच महात्मा फुलेंनी शिक्षणाची चळवळ उभी केली.१९ व्या शतकातील महात्मा ज्योतिबा फुलेंचा परिवर्तनवादी विचार समाजाला शिकण्याची प्रेरणा देत आहे.हे वाचा - बौद्ध संस्कृती आणि संस्कारभारतीय स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना संबोधले जाते. त्याकाळामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीकरिता चालवलेल्या शाळा त्या काळात अस्तित्वात होत्या. पण, बहुजन ...
समाजाचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिबा फुले
Article

समाजाचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिबा फुले

समाजाचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिबा फुलेमहात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाला त्यावेळी तत्कालीन ब्रिटिश राजवटीचा काळ होता. ब्रिटिश भारतात येण्याआधी पेशवाई राजवट होती.पेशवाई राजवट म्हणजे समाजातील  लोकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया पूर्णपणे मोडून त्यांना गुलाम बनविणे. मानवाचे हनन करणारा असा हा कर्दनकाळ होता.. वैदिक संस्कृतीचा पगडा असलेला तो काळ रूढी, परंपरा,  वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, धर्मवाद, कर्मकांड, याने ग्रासलेला होता. चुकीच्या परपरंना बळी पाडून, दैववादाच्या नावावर पाप- पुण्य, स्वर्ग, नरकाची भीती दाखवून सामान्य लोकांना गुलाम बनविल्या जायचे.माणूस म्हणून जगण्याचे अधिकार त्यांच्याकडून हिरावून घेतल्या गेले.. ईश्वरी थोतांड रचून देवाच्या नावावरच अन्याय अत्याचार केले जायचे.. प्रचंड अज्ञान समाजात असल्यामुळे आपण माणूस आहे.. याचा लोकांना विसर पडला. त्यांच्या व...
सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले
Article

सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले

सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले हे सत्यशोधक समाजाचे व बालहत्या प्रतिबंधक गृहाचे संस्थापक,स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, जनतेकडून ‘महात्मा' ही पदवी प्राप्त झालेले सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. त्यांच्या 'ब्राह्मणांचे कसब', 'गुलामगिरी',  ‘शेतकऱ्यांचा आसूड', सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक व अखंड काव्यरचना  या ग्रंथांनी बहुजन समाजात क्रांती घडवून आणली. महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केला असता ते शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते.एक थोर कृतिशील समाजसुधारक युगपुरुष होते, हे स्पष्ट होते.ज्या काळात स्त्री व शुद्रांना परंपरेने शिक्षणाचा अधिकार नाकारला होता त्या काळात महात्मा फुलेंनी सन १८४८ ते १८५१ या चार वर्षात स्त्रीशुद्रांसाठी १८ शाळा काढल्या व योग्य असा अभ्यासक्रमही तयार केला  कारण शिक्षण नसल्यामुळे समाजाचे खूप नुकसान झाले आहे हे सांगताना...
मुलांचा छातीत बसलेला घट्ट कफ कसा काढाल.?
Article

मुलांचा छातीत बसलेला घट्ट कफ कसा काढाल.?

मुलांचा छातीत बसलेला घट्ट कफ कसा काढाल.?लहान मुलांना वयाच्या ५ ते ७ वर्षापर्यंत सतत सर्दी, कफ, खोकला, ताप असे काही ना काही होतच असते, धुळीची ॲलर्जी, विविध विषाणूजन्य समस्या, बदलते हवामान अशा कारणांनी मुलांना या समस्या उद्भवतात. काही वेळा हा कफ ठराविक काळाने बरा होतो. मात्र काही वेळा औषधोपचार आणि घरगुती उपाय करुनही हा घट्ट कफ छातीत तसाच राहतो. अशावेळी वाफारा, शेक देणे, गरम पाणी पिणे असे उपाय केल्यावर हळूहळू बरेच दिवसांनी यावर थोड्या प्रमाणात आराम मिळतो. पण या सगळ्या काळात मुलांची अजिबातच झोप होत नाही. कफ, सर्दी किंवा खोकला यामुळे त्यांना सतत जाग येत राहते आणि मग सलग झोप मिळत नाही. त्यांच्याबरोबरच आपल्याही झोपेचे खोबरे होते ते वेगळेदुसरीकडे कफामुळे अन्न जात नाही त्यामुळे अंगात ताकद राहत नाही. त्यात खेळणे सतत सुरू असल्याने थकवा येतो. असे सगळे झाले की मुलांच्या एकूणच आरोग्यावर त्याचा विपरी...
भारतीय संविधानातील १० महत्त्वाच्या गोष्टी
Article

भारतीय संविधानातील १० महत्त्वाच्या गोष्टी

भारतीय संविधानातील १० महत्त्वाच्या गोष्टी संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे, संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्या शिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही.देशभरात आज संविधान दिवस साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात येते. या निमित्तानं जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी.१) २६ नोव्हेंबरला सं...
मानवी जीवन…
Article

मानवी जीवन…

मानवी जीवन..."व्यक्ती तितक्या प्रकृती" सर्वांचे गुणधर्म वेगळे, स्वभाव वेगळे, जसे  निसर्गात उमललेल्या प्रत्येक फुलांचा रंग, गंध वेगवेगळा असतो पण प्रत्येक आपापल्या वेगळ्या रंगरुपाने गंधाने आपले अस्तित्व टिकवून असते. सर्वच जर गुलाब असते तर प्रकृतीत उमलणाऱ्या प्रत्येक फुलांचा वेगळा गुणधर्म आपल्याला कळला नसता; तेव्हा  गुलाबच सुंदर आणि रानात उगवणारी रानफुले ही सुंदर नसतात, किंवा त्यात काहीही चांगला गुणधर्म नसते असे नाही, फक्त त्यांच्यातील सुप्त गुणधर्मांना समजून घेण्याची  आपल्याकडे मानसिक दुष्टी हवी.जसे नानाविध रंगाची गंधाची फुले आहे तशीच सृष्टीवर नानाविध स्वभावाची, स्वरूपाची माणसे सुद्धा आहेत. जेवढे गुण तेवढे दोष असे  गुणदोषांचे समीकरण म्हणजे मानवी जीवन आणि त्यांच्यातील विविधांगी स्वरूपानुसार बनलेला स्वभाव; स्वभावानुसार जगण्याचे विशिष्ट गुणदोष प्रत्येक व्यक्तीत असते, परिपूर्ण असा कुणीच नसतो...
भारतात कैद्याला फाशी नेहमी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते?
Article

भारतात कैद्याला फाशी नेहमी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते?

भारतात फाशी नेहमी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते ? निर्भया प्रकरणातील बलात्कारी असो किंवा कोपर्डी प्रकरणातील आरोपी असो, त्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली मात्र तुम्हाला माहीती का? भारतात फाशी ही नेहमी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते? काय कारणं आहेत यामागे?  चला जाणून घेऊया यामागची कारणं.* प्रशासकीय कारण तुरूंग प्रशासनासाठी फाशी देणं हे एक मोठं काम असतं. फाशी नंतरच्या वैद्यकीय चाचण्या, वेगवेगळ्या नोंदी, कैद्याच्या कुटुंबाकडं मृतदेह सोपवणं अशी अनेक कामं जेल प्रशासन करत असतं. त्यामुळे फाशी सूर्योदयापूर्वीच आटपून ही पुढची प्रक्रिया दिवसभर केली जाते.* नैतिक कारण कैद्याला फाशीसाठी जास्त वेळ वाट बघायला लावणं हे त्याच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम घडवू शकतं. आता मृत्यू जवळ आलेला पाहून कोणाला बरं वाटेल? त्यामुळे त्याला झोपेतून उठवून, नित्यकर्म उरकून लगेचच फाशी दिली जाते.हे वा...
Article

भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी

भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी(नाशिक जिल्ह्यातील कादवा शिवार दिवाळी अंक २०२३ च्या मुखपृष्ठावर टाकलेला प्रकाश)सालाबादप्रमाणे यंदाची दिवाळी फराळाची रेलचेल घेऊन आली. स्वयंपाकघरातील गृहिणींच्या हाताची चव फराळातून दिसून येत आहे... जून्या जाणत्या स्वयंपाकीण काकूंकडून नव्याने लग्न होऊन आलेल्या नववधू दिवाळीला फराळ शिकून घेतांना दिसल्या तर काही नववधूंनी माहेरात घेतलेलं अस्सल पाककलेचे कौशल्य सासरी अगदी सराईतपणे फराळ करून घरच्या आपल्या माणसांना खायला लावून त्यांच्या जिभेवर माहेराच्या फराळाची चव कशी रेंगाळत राहिल याची दक्षता घेतांना दिसून आल्या.....दिवाळी सण तसा ग्रामीण जीवनशैलीचा एक महत्त्वाचा सण मानला जातो.... वर्षभर शेतीमध्ये काबाडकष्ट करून आपल्या मुलाबाळांना, सुनांना, जावयांना वर्षाअखेरीस गोडधोड खायला घालून, रंगबेरंगी वस्त्राने शरीर आणि मन प्रसन्न करण्यासाठी हा दिवाळीसण साजरा क...