Monday, March 9

Article

हरतालिका व्रत ; स्रीयांवरच बंधन ठेवू नये.!
Article

हरतालिका व्रत ; स्रीयांवरच बंधन ठेवू नये.!

हरतालिका व्रत ; स्रीयांवरच बंधन ठेवू नये.!         दरवर्षी हरतालिका येते व सौभाग्यवती स्रीया तसेच कुमारिका मुलीही हा व्रत करतात. कशासाठी? तर इच्छित पती मिळावा. हा इच्छित पती मिळावा म्हणून कुमारीका, तर सौभाग्य अखंड टिकावं म्हणून सौभाग्य वती स्रीया हा व्रत करीत असतात. या दिवशी दिवसभर स्रीया उपवास करतात. रात्रीही त्यांना उपवास असतो. मग शरीरातील पोषकतत्वे कमी झाल्याने चक्कर येतात. यातच जीवही जावू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही.           सध्या वातावरणाचा कहर सुरु आहे. घरोघरी रुग्ण आहेत. तसं पाहता हा कालच तसा आहे. कधी पाऊस येतो तर कधी नाही. त्यामुळंच आजार. अशावेळी शरीराची प्रतिकारशक्ती तेवत ठेवण्याची आवश्यकता आहे. पण याच काळात उपवास केल्यानं शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास येणा-या संभाव्य धोक्याला कोणताच व्यक्ती वाचविणार नाही नव्हे तर वाचवायला येणार नाही. मग ज्या देवासाठी उपवास केला. तो ...
सिम्बॉल ऑफ Unity
Article

सिम्बॉल ऑफ Unity

सिम्बॉल ऑफ Unityजपानमध्ये  युद्घाच्या काळात हा मुलगा पाठीवर त्याच्या नुकत्याच मरण पावलेल्या भावाला पाठीशी बांधून पायी चालत होता. आपल्या मेलेल्या भावाला निट दफन करता यावं या भावनेने तो दूरवर चालत आला होता. त्याला पाहताच एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला... प्राण गेलेल्या भावाला पाठीवर घेऊन एवढ्या लांब चालत आहेस...ते ओझे खाली टाकून दे..म्हणजे तुला हलके वाटेल.... त्यावर तो मुलगा म्हणाला की, "हे ओझे नाहीये सर,  हा माझा भाऊ आहे.." हे ऐकून त्या सैनिकाच्या डोळ्यांत पाणी तरळले...तेव्हा पासून हा फोटो जपानमधे "सिम्बॉल ऑफ unity" म्हणून प्रसिद्ध झाला...   "हे ओझे नाहीये सर... हा माझा भाऊ आहे..." हा बोध किती सुंदर आहे...हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाआपले (लहान/मोठे)भाऊ बहीण आपल्यावर ओझे नाहीत... आयुष्याच्या वाटेवर चालताना ते पडले तर त्यांना उचला, दमले तर आधार द्या, ते चुका...
निरागस विद्यार्थी अन् हैवान शिक्षक !
Article

निरागस विद्यार्थी अन् हैवान शिक्षक !

निरागस विद्यार्थी अन् हैवान शिक्षक !शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे कारण उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यत्परता खूप महत्वाची आहे. शिक्षकांच्या छोट्य़ा-मोठ्या कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षक मातृहृदयी हवा. यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते. वर्गातील वातावरण प्रेरक होते.मात्र आज शिक्षकांच्या वाढत्या अश्लील हरकतीमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होत आहे. शिक्षकांच्या वाढत्या लैंगिक विकृतीमुळे शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आला आहे.कोणतीही शाळा असो आपल्याकडे गुरुंना सर्वात मोठे स्थान दिले गेले आहे. यामु...
तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर..!
Article

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर..!

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर..!प्रत्येकानं वाचावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही माय-लेकाची यशोगाथा..'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळे यांची..आज या दोघांचा यशोगाथा पाहू.. अमितचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत... तमाशालाच जिथे पंढरी समजली जाते, अशा कोल्हाटी समाजातला तो मुलगा... तो यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी झालाय.घुंगरू आणि ढोलकीसोबत जगणं एकदा का पायी घुंगरू बांधले... की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात... एकदा का ओठ रंगवले की सगळं दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा... ढोलकीवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन फक्त नाचत राहायचं... कोल्हाटी...
एसटीतील प्रवासाचे दिवस..!
Article

एसटीतील प्रवासाचे दिवस..!

एसटीतील प्रवासाचे दिवस..!पूर्वी गावाकडे कच्चे रस्ते असायचे.1990 पर्यंत कडधे गावापर्यंत डांबरी रस्ता होता. यापुढे भोरगिरी पर्यंत कच्चा खडीचा रस्ता असायचा. त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच एसटी बस होत्या.लाल धुराळा उधळीत एसटी यायची.एसटीच्या पाठीमागे धुराचा डोंगर तयार व्हायचा. या धुराळ्यात मागचे काहीच दिसत नसायचे.एसटी आल्यावर आम्ही वाऱ्याची दिशा बघून एसटीचा धुरळा चुकवायचा प्रयत्न करायचो.त्याकाळी रस्ते झाले नव्हते.त्यामुळे ठराविक ठिकाणीच एसटीची सेवा उपलब्ध होती.तेही कच्चे रस्ते होते.अनेक लोक एसटी पकडण्यासाठी घरातून तासभर आधीच पायवाटेने, राना माळातून, डोंगर वाटेने पायी चालत एसटीच्या स्टॉप जवळ येत असत.कधी कधी आधीच एसटी निघून जाई.नाईलाजाने मग लोक पायी चालत. मी सुद्धा अनेक वेळी असा प्रवास केला आहे.त्यावेळी वाहतूकही तूरळक असायची.राजगुरूनगर - डेहणे ही एसटी सकाळी दहा वाजता डेहण्याल...
पोळा सण..काल,आज आणि उद्या
Article

पोळा सण..काल,आज आणि उद्या

पोळा सण..काल,आज आणि उद्या'पोळा, सण करी गोळा ' असे आपण म्हणतो ते खरेच आहे. सण ,उत्सव हे आपल्या संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहेत.आपले सर्व सण हे मराठी महिन्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी तिथीला येत असतात. असा एकही महीना नाही की त्या महीन्यात कोणतातरी सण येत नाही. सर्व मराठी महीन्यात श्रावण महिना हा जास्त पवित्र समजला जातो. श्रावण महिण्याच्या अमावस्येला आपल्याकडे बैलांचा सण म्हणून ' पोळा ' साजरा केला जातो. भारतात हा सण सर्वत्र एकसारखा आणि एकाच दिवशी ,एकाच नावाने साजरा होत नाही. काही राज्यात याला पोंगल म्हणतात व तो वेगळ्या दिवशी साजरा होतो. महाराष्ट्रातही कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या सिमा भागात वेगळ्या दिवशी आणि वेगळ्या पद्धतीने पोळा सण साजरा केला जातो. शेतीच्या हंगामानुसार हा सण आपापल्या भागात वेगवेगळ्या वैशिष्ट्य्यानुसार साजरा होतो.बालपण पुर्णपणे ग्रामीण भागात आणि शेतकरी कुटुंबात गेल्यामुळे ...
म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे.!
Article

म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे.!

म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे.!Article : मी पणा अंगात आल्यानंतर ICU ची रूम बघावी आणि विचार करावा.. जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आय.सी.यु! दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते. तुमचा धर्म,जात,वर्ण, श्रीमंत,गरीब...‌एवढंच नाही तर निसर्गाने तयार केलेला स्त्री-पुरुष हा भेदही इथं नसतो! तो काचेचा दरवाजा ओलांडून मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडता तिथेच गळून पडतात.मध्ये फक्त मानवी शरीर जातं! आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरू असतील... पण जो अर्थ ,जे तत्वज्ञान इथं आय.सी.यु.मध्ये मिळतं,ते कुठेच वाचायला मिळत नाही! आयुष्याचा अर्थ कळतो! म्हणूनच ही जागा फार सुंदर आहे.एखाद्या घरात भुताटकी असते,कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर, मोठ्या झाडाखाली अ...
फुकट संस्कृतीच्या…घो..!
Article

फुकट संस्कृतीच्या…घो..!

फुकट संस्कृतीच्या...घो..! १९७२ मध्ये राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. पाणी होतं, पण लोकांना खायला अन्न नव्हतं. अमेरिकेकडून निकृष्ट गहू व लाल ज्वारी (मिलो) याची. तत्कालिन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईकांनी प्रथमच कायदा करून तत्कालीन विधानसभा सभापती वि. स. पागे यांनी तयार केलेली रोजगार हमी योजना (रोहयो) विधानसभेत मांडून मागेल त्याला काम यासाठी 'रोजगार हमी योजना' कायदा केला. त्या वेळी रोजगार हमीतून रस्ते, तलाव, बंडींग, नाला बंडींग अशी विकासाची अगणित कामे झाली. लोकांना 'श्रमाच्या' मोबदल्यात कामाच्या हिशोबाने सरकारने धान्य व पैसे दिले. सरकारने त्या वेळी मनात आणलं असतं तर आजच्या राज्यकर्त्यांसारखे धान्य व पैसे लोकांना फुकट वाटू शकले असते. परंतु त्यावेळचे राजकारणी धोरणी व व्यवहारी होते. या संकटाचे त्यांनी संधीत रूपांतर केले. भिषण दुष्काळात लोकांना सरकारने जगवीले आणि त्या बदल्यात त्यांनी लोकांकडून व...
बाप बाप असतो..
Article

बाप बाप असतो..

बाप बाप असतो..बाप गेला त्याला आज 8 वर्षे होतायत. कुठलाच शाश्वत उत्पन्नाचा आधार नसताना चौघा मुलांना शिकवण्याची किमया त्यानं केली.कोराटीच्या फोकापासून कणग्या, डाले, टोपले व ताटवे विणने हा त्याचा 'स्वयंरोजगार' होता. गावापासून दूर जंगलातून बाप कोराटीचा मोठा भारा डोक्यावर आणायचा तेव्हा त्याचा चेहरा आणि कपडे पूर्णपणे घामाने ओले झालेले असायचे. त्यानंतर बाप त्या फोकाना साळायचा, काटे काढायचा. नंतर त्यांना वाकवून, पिरगाळून कणग्या व डाले तयार करायचा. हे साळून वाळलेले शेंडे, कोराटीचे तुकडे माय जळतन म्हणून चुलीत टाकायची. टीनाचं 8 पत्राचं घर होतं आमचं. त्यातही काही फूटलेले. पाऊस सुरु झाला की आमची धांदल उडायची. घरातली भांडीकुंडी आम्ही गळणाऱ्या जागी ठेवायचो.प्रस्थापित कवींना पाऊस सुरु झाल्यावर भले प्रेयसीची आठवण येत असेल, मला मात्र त्या गळणाऱ्या टीनाची आठवण येते. त्या रात्री मायनं ओल्या जळतणावर धूर ...
मुन्नाभाई वडेवाले…
Article

मुन्नाभाई वडेवाले…

मुन्नाभाई वडेवाले...सेमाडोह, धारणी जाताना घटांग हे गाव लागते. खरं म्हणजे तो रेस्ट स्टॉपच आहे पर्यटकांचा. प्रत्येकाची गाडी इथे थांबल्या शिवाय राहत नाही. कारण काय तर गरम गरम वडे खायला. या गावात अगदी रस्त्यावर काही छोटी छोटी हॉटेल्स आहेत. यामध्ये मुन्नाभाई चे एक हॉटेल आहे.आजूबाजूला तट्टे बांधलेले.पाऊस आला की उभे राहायची अडचण.मात्र मुन्नाभाई चे हॉटेल दिवसभर हाऊसफुल्ल असते.त्याचे एकमेव कारण म्हणजे इथे मिळणारे गरम गरम वडे. वडे सर्वत्र मिळतात मात्र घटांगचे वडे जिभेला वेड लावणारे. एरवी वडा म्हटल की मुगाचा असतो. त्यातही मुगाच्या डाळीचे वडे तेलात पूर्ण तळले पण जात नाही.गरम असताना ही बाब लक्षात येत नाही. मात्र घटांग येथे तयार होणारे हे वडे मूग डाळ कमी अन् बरबटी डाळ जास्त प्रमाणात वापरून केले जातात. बरबटीचे वडे ही अफलातून रेसिपी आहे. मला वाटते ही येथील लोकांनीच शोधली असेल. अत्यंत चवदार अन् एकाच वे...