📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

तिवसात बोगस बियाण्याचा फटका! बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख भरपाईची जोरदार मागणी

On: July 15, 2026 3:52 PM
आम्हाला फॉलो करा:
तिवसा येथे बोगस बियाणे प्रकरणावर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख भरपाईची मागणी

गौरव प्रकाशन तिवसा | प्रतिनिधी

तिवसा तालुक्यात बोगस बियाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप समोर आला आहे. पेरणी करूनही बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केली आहे.

तालुक्यात विविध कंपन्यांच्या बियाण्यांबाबत तक्रारी वाढल्यानंतर तब्बल 134 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र संचालक आणि तक्रारदार शेतकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत सागर भवते यांनी बोगस बियाणे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची भरपाई मिळवून देण्याची मागणी केली. तसेच बियाणे परीक्षणात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली.

यावेळी तहसीलदार मयूर कळसे, तालुका कृषी अधिकारी हेमलता इंगळे, नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक प्रस्ताव तत्काळ पाठवण्याचे आश्वासन दिले.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

‘खाशाबा’चा नायक कोण? नागराज मंजुळेंचा नवा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

NEET पेपरफुटीविरोधातील उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली.

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; दिल्ली हायकोर्टाची केंद्र व दिल्ली सरकारला नोटीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी वीज जोडण्यांवरील 48 हजार कोटी रुपयांचे थकीत वीजबिल माफ करण्याची घोषणा केली.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीनंतर आता 48 हजार कोटींचे थकीत वीजबिल माफ; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

अमरावती इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर सुशोभीकरण प्रकल्पाला उच्च न्यायालयाची मंजुरी

अमरावतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने भूसंपादनाला दिली वैधता

सिया-केतन हत्याकांडात केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना न्यायासाठी भावनिक पत्र लिहिल्याचे प्रतीकात्मक छायाचित्र

सिया-केतन हत्याकांडात मोठी घडामोड! केतनच्या आईचं पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र; न्यायासाठी आर्त हाक

आषाढी वारीत IAS तुकाराम मुंढे यांच्या पोस्टर्ससह चालणारे वारकरी

आषाढी वारीत IAS तुकाराम मुंढेंचा अनोखा सन्मान; वारकऱ्यांनी पोस्टर्सद्वारे व्यक्त केला आदर

ऐरोलीतील 11 महिन्यांपूर्वीच्या हत्याकांडाचा उलगडा; पत्नी आणि प्रियकर अटकेत

ऐरोलीतील थरारक हत्याकांडाचा 11 महिन्यांनंतर उलगडा; पत्नीने प्रियकरासह पतीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे.!