मॉडर्न ते गोल्डन
आम्ही परसाकडे जात होतो तेव्हा,तुम्ही शौचालय गाठलंआम्हालाही वाटलंतुमच्यात यावंम्हणून,आम्ही पण शौचालयाजवळ आलोपण तुम्ही,ते सोडलं आणिबाथरूम मध्ये गेलातआम्हीच आम्हाला मागास ठरवूनबाथरूम मध्ये येणारचतोवर तुम्ही टॉयलेटकडे पळालातमग,आम्ही पण धावत टॉयलेट जवळ आलोपण तेवढ्यात तुम्हीवॉशरूम घेतलंआम्ही वॉशरूम पर्यंत यायच्या आधीचतुम्ही,डायरेक्ट फ्रेश व्हायला निघून गेलात…तुमचा पाठलाग करूनआम्ही थकून गेलोतुम्ही आम्हाला गावंढळ समजूनलांब ठेवलं…आम्ही मिरच्या भाजूनझणझणीत ठेचा कुटलातेव्हा तुम्ही सॉस घेतलाआम्ही आळणी वाढणारतेवढ्यात तुम्ही सूप पिलेपातीचा कांदा आम्ही ताटाला लावलातर तुम्ही सॅलड मागवलं..आम्ही चुलीवरपिठलं भाकरी बनवून दिलीतुम्ही पिझ्झा बर्गर जवळ केला..साजूक तुपातली खिचडी घेऊन
...









