कुष्ठरोग निर्मूलन जागृतीसाठी अमरावतीच्या आरोग्य सेवा कार्यालयाला पुरस्कार
गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात आरोग्य शिक्षण व जनजागृतीसाठी उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कार्य केल्याबद्दल येथील सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयाला पुणे येथील समारंभात नुकतेच गौरविण्यात आले.
पुण्यात यशदा येथे उत्कृष्ट कामगिरी करणा-या अवैद्यकीय पर्यवेक्षक, अवैद्यकीय सहाय्यक, निम वैद्यकीय कर्मचारी व सांख्यिकी सहाय्यक यांना मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आरोग्य व कुटुंब कल्याण सहसंचालक डॉ. सुनील गीत्ते, डॉ. विवेकानंद गिरी, डॉ. सुनीता गोलाईत आदी उपस्थित होते. अमरावती कार्यालयातर्फे डॉ. अंकुश शिरसाट यांनी सत्कार स्वीकारला.
मोर्शी तालुक्यातील अवैद्यकीय सहाय्यक संपदा गटलेवार व निमवैद्यकीय कर्मचारी निळकंठ ठवळी यांनाही यावेळी गौरविण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका यांच्या समन्वय व सहकार्याने कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे श्री. शिरसाट यांनी सांगितले.
● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधनhttp://”https://www.gauravprakashan.com/2022/10/blog-post_47.html”