Wednesday, March 4

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

माझी आई मायेचा सागर..!

आई गेल्यानंतररडून मोकळे  होता आले नाही... वात्सल्याच्या पारंब्या अपरंपार असतात... अजूनही तिचा काळजीवाहू वावर जाणवतो चराचरातूनएक मोठीच पडझड एका अंधार संध्याकाळी दिवे लावणीनंतर आईने डोळे मिटले आईच्या  डोळ्यातला उजेड विझला... उभारी देणारा...माझ्यासाठी मीच पोरका झालो हे पोरकेपण कशानेच झाकत नाही मृत्यू असा निःपात करतो एकाएकी घडते नको ते निसर्गाच्या करुणेचेही गूढ उलगडत नाही !अनेक ठेचा आघात अश्रू काळजीने पोखरलेल्या रात्री कष्टाने थकलेले दिवस श्रांत संध्याकाळी ती शोधत राही दुःखाचा परिहारशेत, नदी आणि  निसर्ग हाच तिचा भाव तिच्या हातातला विळा तणाने वेढलेल्या पिकास धीर देई गांजलेली भूई लख्ख  होई...आठवांचे आभाळ भरुन येते पुनःपुन्हा गाव आणि  वावर तिचा सत्त्यावरचा निःसिम भक्तीभाव जाताना  कुणाही विषयी कसलीही  तक्रार नाही मातीनेच शिकवला होता तिला क्षमाभाव... - सुभाष गडलिंग         वडीलांनी म...
Article

ऊच्चशिक्षितांची निरक्षर माता राधामाय.!

डोंगर पायथ्याशी वसलेलं यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तहसिलमधलं करजगांव हे गांव. तसं पाहिलं तर सारं करजगावच राधामायचं गणगोत होतं. गावातील प्रत्येक पुरुष तिच्या नात्यात होता. कोणी तिचा बाप, कोणी भाऊ, कोणी काका, कोणी मामा, कोणी दिर, कोणी भासरा, कोणी सासरा, तर कोणी मुलगा होता. आणि असंच नातं तिचं प्रत्येक बाई सोबतही होतं. भिकारी, म्हाताऱ्या बाया, सासुरवाशिणी सूना यांचं हक्काचं आणि मदतीचं ती आश्रयस्थान होती. गावातल्या प्रत्येकाशी तिचे प्रेमाचे आणि फार आपुलकीचे संबंध होते. सारं गाव तिला प्रेमानं राधु म्हणायचे..!   जवळपास साडेपाच फूट उंच, तेवढीच अंगात भरलेली, गौर वर्ण, छान आकर्षक चेहरा, नाकी डोळी छान, कपाळावर भलं मोठं कुंकू, (आजीची ही खास ओळख होती) नऊवारी पातळ (लुगडं) यात ती अधिकच खुलून दिसायची. चौदा पंधरा वर्षाची असतानाच राधाचं कृष्णाजी सोबत लग्न झालं.(राधा-कृष्णा हा योगायोग होता) त्यावेळी तिला फारस...
Gerenal

बापाला हृदयात जपून ठेवू..…

बाप.…बाहेरून मुलांसाठी कठोर पण आतून फार नाजूक असलेला प्रत्येक घरातील देवमाणूस. कुटुंबाच्या हिताची काळजी घेणारा बापच असतो. मुलांना कामाहून परत येताना खाऊ आणायला कधीच न विसरणारा तोही बापच असतो. कधीकधी कामाच्या मनःस्तापाने रागाच्या भरात मुलांवर ओरडून काही क्षणातच सर्वकाही विसरून प्रेमाने आपल्याला जवळ घेतो तो बापच असतो. पहिल्यांदा आपल्या नाजूक हाताला धरून आपल्याला चालणे शिकवतो तो आपला बापच असतो. जगातल्या प्रत्येक मुलींसाठी तर बाप म्हणजेच सुपरहिरो असतो. बाप कधीच आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी आठवत नाही, पण मोठ्यात मोठ्या संकटाच्या वेळी " बापरे ! " हा शब्द आपल्या तोंडातून निघाल्याशिवाय राहत नाही. बाप कितीही कठोर दिसत असला तरी तो कधीच आपल्या मुलांसाठी आतून कठोर असूच शकत नाही. बाहेरून वादळासारखा दिसणारा पण आतून पणतीसारखा पेटून आपल्या कुटुंबाला प्रकाश देतो तो असतो जगावेगळा बाप.कोणताच बाप सणा...
Gerenal

ऋतूनुसार रंगांची निवड

उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या या ऋतूबदलाच्या काळात प्रावरणांच्या रंगांमध्येही बदल करावा लागतो. यंदाच्या सीझनमध्ये कोणते कलर्स ट्रेंडमध्ये आहेत यावर एक नजर टाकू.  मरून- प्रत्येक ड्रेस टाईपमध्ये या रंगाचं वेगळं स्थान आहे. या मान्सूनमध्येही हा रंग जलवा दाखवत आहे. या रंगाच्या शेड्सनी मनावर अधराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. या रंगामध्ये मॅक्सी, जंपसूट, ऑफ शोल्डर टॉप, रिफिल्स टॉप, कोल्ड शोल्डर टॉप आणि शॉर्ट ड्रेस टेंडमध्ये आहेत.  ग्रीन शेड- ताजेपणाचं प्रतीक म्हणजे ग्रीन शेड. हा रंग प्रत्येक वर्णाच्या व्यक्तीला खुलून दिसतो. यात वॉर्म टोनमध्ये मस्टर्ड ग्रीन कलर, खाक आणि डार्क ग्रीन कलर पसंत केले जात आहेत. ट्रेंडचा विचार कराल तर ब्राईट ग्रीन किंवा पॅरेट ग्रीन कलरला महिलांची पसंती आहे. पीच- काही फॉर्मल इव्हेंट्सना क्लासिक लूक हवा असेल तर हा कलर बेस्ट आहे. पीच कलरचा बेल स्लीव्हजचा ड्रेस खास ...
Gerenal

जपा दातांचे आरोग्य

पुरेशी काळजी घेतली नाही तर दातांच्या नानाविध समस्या उत्पन्न होतात. दातांमध्ये पोकळी निर्माण होणं ही त्यातील एक समस्या आहे. मात्र काही उपायांनी ही समस्या टाळता येऊ शकते. याविषयी.. ॅ दातांमध्ये स्वत:चं संरक्षण करण्याची क्षमता असते. त्याचबरोबर दातांवरचं एनिॅमल टिकवून ठेवण्यात लाळ महत्त्वाची भूमिका बजावते पण तयार होणार्‍या आम्लाचा हल्ला परतवून लावण्यासाठी एवढं पुरेसं ठरत नाही. आम्लामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते. दातांची झीजही होते. हे टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.ॅ दातांची योग्यप्रकारे काळजी घ्यायला हवी.दिवसातून दोन वेळा दात घासायला हवेत. दातांमध्ये अन्नकण अडकणार नाहीत याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवं. माउथवॉशचा वापर करायला हवा. ॅ विशिष्ट प्रकारच्या अन्नामुळे तोंडात बॅक्टेरियांची निर्मिती होते. साखर तसंच कबरेदकांमुळे बॅक्टेरियांची झपाट्याने वाढ होते. हे बॅक्टेरिया विशिष्ट प्रकारच्या आ...
Gerenal

करिअर मर्चंट नेव्हीतले

जगभरात भ्रमंती करण्यासोबतच विविध ठिकाणच्या संस्कृतींची ओळख करून घेणं र्मचंट नेव्हीतल्या करीअरमुळे शक्य होतं. र्मचंट नेव्ही हा करीअरचा धाडसी पर्याय आहे. यात तुम्हाला वर्षातले सहा महिने बोटीवर रहावं लागतं. म्हणजे एवढा काळ तुम्ही समुद्रात असता. चहूबाजूला निळंशार पाणी खुणावत असतं. म्हणूनच उत्तम आणि धाडसी करीअरच्या विचारात असाल तर र्मचंट नेव्हीचा मार्ग तुम्ही निवडू शकता.र्मचंट नेव्हीमध्ये डेक कॅडेट किंवा नॅव्हिगेटिंग अधिकारी म्हणून तुम्ही काम करू शकता. हे अधिकारी बोट, इंधनाची टाक, कार्गो यांच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडतात. र्मचंट नेव्हीच्या माध्यमातून माल वाहतूक होते. बोटीत माल भरणं आणि उतरवणं या कामांकडे डेक कॅडेटला लक्ष ठेवावं लागतं. पुरेशा अनुभवानंतर तुम्ही थर्ड ऑफिसर, सेकंड ऑफिसर आणि चीफ ऑफसर अशी पदं मिळवू शकता. र्मचंट नेव्हीमध्ये जाण्यासाठी फिजिक्स, केमस्ट्री आणि गणित हे विषय घेऊन बार...
Article

तरूणाईचा पाऊस..!

आज आकाश गर्द मेघांनी भरुन आलं होतं.आकाशाचा राखडी रंग जाऊन काळाकुट्ट रंग प्राप्त झाला होता.चरावयास गेलेले सारे खग घरट्याच्या ओढीने रॉकेटसमान धावत होते.किलबिलाट करत होते.झाडावर नाचत होते.झाडांच्या रांगेमध्ये नव संगीताचे स्वर छेडत होते . पावसाची चाहूल हे प्रथम पक्षांना व प्राण्यांना कळते म्हणतात ते असू शकते.मी माझ्या बाईकने प्रवास करीत होतो.मेघ दाटून आलेल्या नभातून भूतलावर केव्हा पाऊस पडेल याचा नेम नव्हता ,तसा पाऊस पूर्व सुचना देऊन येत नसतो, पण त्यांची गंधवार्ता सृष्टीतून जाणवू शकते.पाऊस कधीही,केव्हाही,कसाही येते."होत्याचं नव्हतं करतो,नव्हत्याचं होतं करतो."हा पाऊस कवीचा खूप आवडता असतो.पाऊस आणि कविता हे गणित खूप चांगलं जमतं.या पाण्यासाठी बाबासाहेबांनी मोठा संघर्ष केला ."विद्रोहाचे महाड संगर घडून माणवमुक्तीचे महा आंदोलन केले ". पाणी हा जीवनाचा मूल्यवान नैसर्गिक घटक पण यावर  सनातनी मानवाची मक्ते...
Gerenal

मान्सून ट्रेकिंग स्पॉट्स

दोस्तांनो, ट्रेकर्स मान्सूनकाळात मोठय़ा प्रमाणावर ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात. पावसाळा हा ट्रेकिंगसाठीचा सर्वोत्तम काळ मानला जातो. लवकरच मान्सूनचं आगमन होणार आहे. कोरोनाची प्रकरणं कमी होत असल्यामुळे येत्या काळात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात ट्रेकिंगच्या योजना आखल्या जातील. तुम्हालाही ट्रेकिंगची आवड असेल तर या ठिकाणांचा विचार करता येईल. * हिमाचल प्रदेश हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण. सध्या वर्केशनसाठीही अनेक जण हिमाचलला जातात. इथे ट्रेकिंगची अनेक ठकाणं आहेत. हाम्टा पास हे असंच एक ठिकाण. नवख्या ट्रेकर्ससाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. कुल्लू खोर्‍यातल्या हाम्टा पासपासून या ट्रेकला सुरूवात होते. हा ट्रेक स्पती व्हॅलीपर्यंतचा ३५ कलोमीटरचा हा ट्रेक आहे. साधारण चार ते पाच दिवसात हा ट्रेक पूर्ण होतो. * लोणावळ्याजवळचा राजमाची किल्ला ट्रेकर्सना भुरळ पाडतो. राजमाचीचा ट्रेक सोपा असून ट...
Gerenal

इंजिनिअरिंगनंतर डीआरडीओ

सध्या लष्कराच्या अत्याधुनिक करणावर तसंच शस्त्रसज्जतेवर दिला जात असलेला भर सर्वसामान्यांच्या नजरेतूनही सुटण्यासारखा नाही. भारतीय लष्कराला लागणारी शस्त्रास्त्रं तयार करण्याचं काम संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या संस्थेतर्फे केलं जातं.या संघटनेतर्फे अनेक प्रकारची क्षेपणास्त्रंही विकसित केली जातात. शिवाय सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही प्रगत देशांच्या सहकार्यानं भारतातच विविध अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि चाचणी या क्षेत्रात मेकॅनिकल आणि एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगसारखा अभ्यासक्रम पूर्ण करुन बाहेर पडलेल्या पदवीधरांना उत्तम वेतनाच्या नोकर्‍या प्राप्त होऊ शकतात.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया प्रयोगशाळांमध्ये विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यात उत्तीर्ण झाल्याखेरीज क्षेपणास्त्रं लष्करात वापरली जात नाहीत. त्याम...
Gerenal

रोगनिदान आवाजातील बदलांवरून..

शरीरयंत्रणेतील काही बिघाड अनारोग्याचे निदर्शक असतात. शरीराला एखाद्या व्याधीने ग्रासल्यास लगेचच अथवा काही काळाने शारीरिक लक्षणं दिसू लागतात. मात्र काही लक्षणं दिसत नसली तरी अनेक आजार सुप्तावस्थेतच राहतात हेदेखील आपण समजून घ्यायला हवं. अशा प्रकारे एकीकडे आपण गाफिल असतो तर दुसरीकडे शरीर व्याधीग्रस्त होत असतं. ही स्थती टाळण्यासाठी संशोधक विविध आजारांचं वेळेत निदान करणार्‍या पद्धती शोधून काढण्यात व्यग्र असलेले पहायला मिळतात.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजयाचाच एक भाग म्हणून अमेरिकेतील संशोधकांच्या एका गटाने आवाजाच्या सहाय्याने मेंदूतील विकारांचं निदान करणारं उपकरण शोधून काढलं आहे. मेंदूतील काही विकार क्रॉनिक अवस्थेत पोहचल्यानंतरच समोर येतात. त्यामुळे रुग्णाला उपचार घेण्याची संधीच मिळत नाही. मात्र या उपकरणाच्या सहाय्याने आजार प्राथमिक अवस्थेतच समजतात आणि उपचारांती रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते...