Wednesday, March 4

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

अण्णाभाऊ साठे; एक थोर व्यक्तीमत्व

अण्णाभाऊ साठे हे एक अलौकिक व्यक्तीमत्वाचे धनी होते. ते कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावीत झाले होते. त्यांनी लालबावटा कलापथक स्थापन केलं होतं.अण्णाभाऊ साठेचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होतं. त्यांचा जन्म १ आगष्ट १९२० रोजी झाला होता. त्यांचा जन्म सांगलीचा. ते समाजसुधारक, लोककवी व लेखकही होते. त्यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी आजही जगतात गाजत आहे.अण्णा हे आंबेडकरवादी व मार्क्सवादी विचारसरणीचे होते. सुरुवातीला त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडला व नंतर ते आंबेडकरवादी झाले. ते शिक्षण शिकले नाही. अर्थात कोणत्याच शाळेत गेले नाही. तरीही ते शाहिर, कादंबरीकार व कथाकार म्हणून ओळखले जातात.त्यांच्या आईचे नाव वालबाई होतं. तर पत्नीचे नाव जयवंता. त्यांच्या पत्नीला कोंडाबाई देखील म्हणत असत.अण्णा हे मातंग समाजाचे असून त्या काळी होत असलेल्या भेदभावाचे चटके ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांना बसले. तसेच ते अण...
Gerenal

स्टायलिश दिसायचेय?

सध्या मान्सून सेलचे दिवस आहेत. या दिवसात कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त खरेदी करण्याचा तुमचा मानस असेल. मात्र, कोरोनाचं संकट लक्षात घेता खरेदीसाठी बाहेर पडताना तसंच खरेदी करताना पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात, खरेदीमध्ये बजेट, ट्रेंड आणि स्टाईल यांचा त्रिवेणीसंगम साधायला हवा. खरेदी करताना लेटेस्ट ट्रेंड माहिती असणं गरजेचं आहे. या धर्तीवर खसा जपूनही स्टायलिश कसं दिसावं याविषयी.उत्सवांदरम्यान फ्युजन लूक ट्रेंड जोरात आहे. तो फॉलो करा. एम्ब्रॉयडरी किंवा फ्लोरल पिंट्रच्या स्कर्टवर प्लेन टॉप किंवा क्रॉप टॉप चांगला लूक देईल. या पेहरावाबरोबर योग्य अँक्सेसरीजचा वापर केला तर ट्रेंडी लूक मिळतो. फारशी झकपक न करता ट्रेंडी कॅज्युअल लूक मिळवायचा असेल तर पलाझोबरोबर ट्युनिक टॉप कॅरी करा. पारंपरिक टच देण्यासाठी झुमके किंवा शोल्डर ईअररिंग्ज घालू शकता. क्रॉप टॉपसोबत हेरम किंवा धोती पँट्स घालणं सध्या ट्रे...
Article

प्लास्टिक आणि पॉलिमर… भविष्यातील नवीनतम संधी

विसाव्या शतकाच्या सुरवातीला रसायन शास्त्रामध्ये झालेल्या पाच प्रमुख शोधांमधील पदार्थ म्हणजे प्लास्टिक (काळ 1909 ते 1972). त्या काळचे इतर प्रमुख शोध म्हणजे 'अमोनिया' ची निर्मिती, पेनिसिलीन, गर्भनिरोधक गोळ्या आणि लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (LCD). रसायन शास्त्रामध्ये झालेल्या या पाच प्रमुख शोधामुळे आपण आधुनिक जगाची कल्पना करू शकलो.मुळात प्लास्टिक हे पॉलिमर पासून बनविले जाते. पॉलिमरवर यांत्रिक प्रक्रिया (moulding) करून जे उत्पादन बनविले जाते त्याला 'प्लास्टिक' म्हणतात. पॉलिमर हे असंख्य अश्या कार्बन आणि हायड्रोजन रेणू पासून बनलेले असतात. कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) शुद्धीकरण प्रक्रियेत जे घटक बाहेर पडतात त्यापासून पॉलिमर बनविले जाते. प्लास्टिक हे अल्पावधीतच सर्व क्षेत्रांमध्ये वापरले जाऊ लागले. कारण की त्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे. प्लास्टिक हे हलके, टिकाऊ, मजबूत, विद्युतरोधक आणि पुनर्वापर य...
Article

मनाला स्पर्शून जाणारी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांची काव्यसंपदा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या दि. 29/07/2021 ला असलेल्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचे त्यांच्याच कवितेतून काव्यमय दर्शन घडविणारा ”मनाला स्पर्शून जाणारी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांची "काव्यसंपदा” हा प्रा. अरुण बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.- संपादकराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार आचरणात आणणारे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष, विद्वत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करणारे लोकमहर्षी, राष्ट्रसंताचे व संत गाडगेबाबांचे तत्त्वज्ञान-विचारसारणी आंमलात आणणारे कीर्तनकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात डोळसपण...
Article

समाजसुधारक फातिमा शेख

“फातिमा शेख या आधुनिक भारताच्या समाज सुधारक होत्या” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. त्यांनी सावित्रीबाई बरोबर शिक्षण घेतले होते. त्यांनी पुणे येथे अध्यापकीय शिक्षण घेतले होते.त्यामुळे त्या भारतातील मुस्लीम समाज्याच्या पहिल्या शिक्षिका म्हणून अग्रेसर होत्या. महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडे वाडा येथे मुलीसाठी पहिली शाळा सुरु केली त्या शाळेत फातिमा शेख सावित्रीमाई फुले बरोबर शिकविण्याचे कार्य करीत होत्या त्या शाळेत प्रवेश घेतलेल्या ६ मुली होत्या काही लोकांच्या मते फातिमा शेख या त्या पैकी एक होत्या, असा समज आहे असे नसून महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या बरोबरीने काम करणारी धाडसी महिला होती यासाठी फातिमा शेख यांचा भाऊ उस्मान शेख यांनीही सहकार्य केले आहे. खरे तर इंग्रज सरकारच्या काळात आणि सनातनी जातीयवादी ब्राह्मण यांच्या विरो...
Gerenal

प्रदूषणामुळे होते केस गळती..!

आजकाल वाढत्या प्रदूषणाचे अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. विशेष म्हणजेया प्रदूषणामुळेकेस गळण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. महिलाच नाही तर पुरुषांनाही केस गळण्याच्या समस्येने ग्रासलं आहे. प्रदूषित कणांच्या सततच्या संपर्कामुळे केसांच्या वाढीला कारक ठरणार्‍या प्रथनांचं प्रमाण घटतं आणि केस गळू लागतात. हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.! दक्षिण कोरियातल्या एका कंपनीने केलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासातून केस गळणं आणि प्रदूषण यांचा संबंध दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणूनच शहरी भागातल्या लोकांमध्ये केसगळतीचं प्रमाण वाढल्याचं पहायला मिळतं. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज...
Gerenal

ओढ आप्तांची

आजोबांचं वय ८५ च्या पुढचं. वयापरत्वे आलेलं आजारपण होतंच. आजोबा खरं तर पुण्याचे. पण पत्नीच्या निधनानंतर त्यांना मुलीसोबत मुंबईला जावं लागलं. आता ते तिथेच राहतात. तिथे जावई, दोन लाघवी नाती त्यांची खूप काळजी घेतात.त्यांनी तिथे मित्रपरिवारही जमवला आहे. सोसायटीतल्या बाकड्यावर बसून गप्पाही होत असतात. मात्र त्यांना पुण्याची, इथल्या मित्रपरिवाराची, नातेवाईकांची आठवण येत असते. पुण्याला यायचं म्हटलं की त्यांच्या अंगात नवा उत्साह संचारतो. मधल्या काळात कोरोनामुळे त्यांना पुण्याला येत आलं नाही. यायची खूप इच्छा! पण वयामुळे कोणी पाठवत नव्हतं. मग कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर कुटुंबासोबत ते पुण्याला आले. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज नातेवाईकांच्या घरी गेले. पण चांगलेच खंगलेले दिसले. मलूल चेहरा, थकलेली गात्र यामुळे आजोबा खूपच म्हातारे दिसत होते. आजोबांना अशा अवस्थेत बघून धक्काच बसला अशीच प्रत्येकाची भावना हो...
Gerenal

नर्सिंगच्या क्षेत्रात आहे वाव

नर्सिंग आणि मिडवायफरी हा रोजगाराची उत्तम संधीमिळवून देणारा अभ्यासक्रम असल्याने इच्छुकाने त्याचा विचार करायला हवा. आजकाल मोठय़ा शहरातील संघटित क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये परिचारिका आणि परिचारकांना आकर्षक वेतनाच्या नोकर्‍या मिळत आहेत. या पदांवर काम करण्यासाठी परदेशी जाता यावं या हेतूनेही या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला जातो. प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिला नर्स असतात. पण पुरुषांनासुद्धा या क्षेत्रात चांगली संधी आहे. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज आणखी एक बाब म्हणजे नर्सिंगच्या क्षेत्रात केवळ हॉस्पिलटमध्येच संधी आहेत असं नाही तर अनाथार्शम, वृध्दार्शम, सॅनटोरियम, उद्योग तसंच लष्करातही नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण करणार्‍यांना उत्तम कारकिर्द करता येते. नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांसाठी मेडिकल टुरिझमचं क्षेत्रही महत्त्वाचं ठरतं. आपल्याकडे भारती विद्या...
Gerenal

केस सुकवा नैसर्गिकरित्या

पावसाळ्यात केस सुकवणं हे एक जिकरीचं काम असतं. केस सुकविण्यासाठी ड्रायरचा वापर केला जात असला तरी या उपकरणाचा कमीत कमी वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून कायमच दिला जातो. पण काही दिवसांपूर्वी एका संशोधनातून सिद्ध झालं आहे की, हेअर ड्रायरने सुकवलेले केस नैसर्गिकरित्या सुकवलेल्या केसांपेक्षा जास्त निरोगी राहतात. अर्थात असं असलं तरी ड्रायरचा वापर र्मयादित ठेवावा हे देखील त्यांनी अधोरेखित केलं आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात केस सुकण्यास वेळ लागतो. हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज या दरम्यान केसांमध्ये पाणी राहून स्काल्पला सूज येऊ शकते. म्हणूनच नैसर्गिक पद्धतीने लवकरात लवकर केस सुकविण्यासाठी काही टिप्स अनुसरता येतील. शॉवर घेतल्यानंतर सर्वात आधी टॉवेलने केसांमधील पाणी टिपून घ्यावं. त्यानंतर हलक्या हाताने केस पुसावे. खसखसून पुसल्यास केसांना इजा होण्याचा संभव असतो. केस थोडे दमट असले तरी कंगव्याने विंचरू...
Article

जिद्द व परिश्रमाचे दुसरे नाव उत्तम सोनकांबळे

उभ्या आयुष्याला संघर्षमय खाचखळगे लाभले असतांना अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीतून परिश्रमाच्या जोरावर उत्तम कांबळे ह्यांनी राज्यसेवा परिक्षेत यश मिळविले. आता ते औरंगाबादला सहसंचालक (कोषागार विभाग) पदावर कार्यरत आहेत. आयुष्याला उजेडवाट मिळाली आहे. मात्र ह्या वाटेवर पोहोचण्यासाठी त्यांनी केलेला प्रवास कुणालाही चकित करुण टाकणारा 'आश्वासक' असाच आहे. जाणून घेऊ या त्यांच्या प्रवासाविषयी ...दोन वेळच्या भाकरीच्या शोधात त्यांच्या वडीलांनी मुखेड तालुक्यातील शिकारा हे गांव गाठलं. शिकारा गावची त्यावेळेची वस्ती फारतर एक हजार लोकांची. गावात घर नव्हतं, शेती नव्हती, उत्पन्नाचं साधन नव्हतं. तरीही मुलांना त्यांनी शाळेत घातलं. खेड्यापाड्यातील आंबे, पपई, फळे, भाजीपाला ठोकभावाने विकत घ्यायचा व गावापासून ८, १० किलोमिटर अंतरावर मुखेडला नेवुन, बाजारात दिवसभर विकायचा. अंधार पडण्याच्या आत ज्वारी-बाजरी विकतघ्यायची ती ति...