चौकातले सुरमा भूपाली…!
सत्तरच्या दशकात 1975 मध्ये शोले चित्रपट आला होता.हा चित्रपट 70 एम.एम.च्या पडद्यासाठी बनवला गेला होता .त्या अगोदर 35 एम.एम.चे पडदे असायचे. या चित्रपटात,खूपच रंजक गोष्टी होत्या.यात,मैत्री होती, प्रेम होते,संघर्ष होता,गाणे होते, मनोरंजन होते,दरोडे होते असूया होती,नौटंकी होती.अशा अनेक गोष्टी एकच चित्रपटात बघायला मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे याचे डायलॉग खूप छान होते, डायलॉग त्या काळातल्या प्रेक्षकांना मुखोद्गत होते,प्रेक्षकांचे एकदा चित्रपट बघून मन भरत नव्हते ,प्रेक्षकांनी अनेकदा चित्रपट पाहिला,आजही पाहतात.मुंबईतील मिनर्वा टॉकीज इथे साधारणपणे पाच वर्षे हा चित्रपट रोज मॅटीनी शो ला होता तरीही प्रेक्षक मिळायचे.एकदा पाहून कोणाचे समाधान होत नव्हते, वारंवार पाहिला जायचा.इतके गारुड या चित्रपटाचे प्रेक्षकांवर होते. आजही आहे.या चित्रपटाने अमिताभ बच्चनला,धर्मेंद्र ला महानायक बनवले.तर गब्बरच्या भूमिकेत अ...
