खापरखेडातील जादुई एटीएम मशीन ; खुल जा सिम सिमचा प्रकार
एटीएम ला ऑटोमेटेड टेलर मशीन अर्थात अँटोमँटिक ट्रेनी मशीन असं म्हटल्या जाते. त्याला अशा प्रकारे ट्रेन केल्या जाते म्हणजे त्याची सिस्टम बनवल्या जाते की, तुम्हाला जेवढे पैसे काढायचे असते, तेवढ्याचा आकडा टाकल्यानंतर तो तुम्हाला तेवढेच पैसे देत असतो. पण एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेल्यावर दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आश्चर्य वाटतंय ना? पण असा प्रकार नागपूरातून समोर आला आहे. तिथे एटीएम मधून ५०० रुपये काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला दुप्पट, तिप्पट नाही तर चक्क पाचपट पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे. एटीएम मधून ५०० रुपये विड्रॉल केल्यावर २५०० रुपये निघत असल्याचा व्हिडीओ सुद्धा शूट करण्यात आला असून तो व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.
काय आहे नेमकं प्रकरण? नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील एका एटीएम मधून ५०० रुपये विड्राल टाकल्यावर एटीएम मशीन मधून चक्क २ हजार ५०० रुपये ...