ऐक्यासाठी रक्तदान….
रक्तदान अनमोल आहे. आपले रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते. रक्ताची गरज कोणाला कधीही आणि कुठेही लागू शकते. त्यामुळे करुन “दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे” हे व्रत सर्वांनीच अंगिकारणे गरजेचे आहे.
Donating blood is an act of solidarity. Join the effort and save live, असे जागतिक आरोग्य संघटनेचे यंदाच्या वर्षीचे रक्तदान दिनानिमित्तचे घोषवाक्य आहे. रक्तदानाबाबत जाणिव जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी ‘जागतिक रक्तदाता दिन’ साजरा केला जातो.
संशोधक कार्ल लॅन्डस्टायनर यांचा १४ जून हा जन्म दिवस. त्यांनी ABO रक्तगटाचा शोध लावला. ‘जागतिक रक्तदाता दिन’ प्रथम सन २००४ मध्ये साजरा करण्यात आला आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी हा दिन जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. रक्तदान करुन रुग्णांसाठी life saving gift दिलेले आहे अशा दात्यांचे व रक्तदान शिबीर संयोजक यांनी रक्...