तोंडाला येणारी दुर्गंधी ही अनेकांची समस्या..!
अन्नातून शरीरात जाणार्या0 प्रथिनांचे विघटन करणे हे बॅक्टेरियांचे प्रमुख काम. पण, शरीरात बिघाड निर्माण झाल्यास बॅक्टेरियांच्या कामात अडथळे येतात. ते योग्य पद्धतीने प्रथिनांचे विघटन करू शकत नाहीत. यामुळे तोंडाला एक प्रकारचा वास येऊ लागतो. तोंडाला येणारी दुर्गंधी ही अनेकांची समस्या असते. त्यावर उपाय म्हणून आपण एखादी मिंटची गोळी चघळतो किंवा दात घासतो. यामुळे तोंडाची दुर्गंधी तात्पुरती कमी होते. पण, तोंडाच्या दुर्गंधीचा संबंध एखाद्या आरोग्यविषयक समस्येशीही असू शकतो. त्यामुळे तोंडाच्या दुर्गंधीकडे एक साधीशी समस्या म्हणून दुर्लक्ष करता कामा नये.
तोंडाच्या दुर्गंधीचे कारण
काही प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे तोंडाला दुर्गंधी येते. हे बॅक्टेरिया जीभ, घसा आणि टॉन्सिल्सच्या मागच्या भागात असतात. अन्नातून शरीरात जाणार्याब प्रथिनांचे विघटन करणे हे या बॅक्टेरियांचे प्रमुख काम. पण, शरीरात बिघाड निर्माण झ...