Tuesday, March 3

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
राजकीय पक्ष, नेत्यांची आश्वासने आणि स्वप्ने !
Article

राजकीय पक्ष, नेत्यांची आश्वासने आणि स्वप्ने !

राजकीय पक्ष, नेत्यांची आश्वासने आणि स्वप्ने !मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी घोषणा पत्रात राजकीय पक्ष वाटेल त्या घोषणा करतात.निवडणुका ही एक विचित्र गोष्ट आहे. पैसे वाटण्यावर बंदी असली तरी कर्जमाफीच्या आश्वासनांवर कोणतेही बंधन नाही. नोकऱ्यांची आश्वासने, बेरोजगारांना पैसे देण्याची आश्वासने - हे काय आहेत? शेवटी, हे फक्त मतदारांना आकर्षित करण्याचे डावपेच आहेत. त्यांच्यावर बंधने का घातली जात नाहीत? सर्वोच्च न्यायालयाने मोफत आश्वासनांना आळा घालण्यासाठी त्वरित तज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. तसेच निवडणूक आयोग, नीती आयोग, कायदा आयोग आणि सर्व राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या.मात्र निवडणूक आयोगाने यावर संदिग्ध उत्तर दिले.राजकीय पक्षांना ,आश्वासने देण्यापासून रोखणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. त्या आश्वासनांवर विश्वास ठेवावा की नाही, ती बरोबर आहेत की चूक, हे जनतेच्या विवेकबुद्धीवर अव...
माणूस तोडत चाललेली गावं…
Poem

माणूस तोडत चाललेली गावं…

माणूस तोडत चाललेली गावं...मी बघतोय दिवसेंदिवसजातिय सलोखा हरवतचाललेली  गावं....नात्यापासून नाती तोडतचाललेली गावं...राक्षसी विचारांनी पक्ष बांधनी करत..माणसापासून माणूस तोडतचाललेली गावं....रस्ते,डांबरीकरण,मंदिर,भवन पुल,नाले दुरूस्तीलाच विकास समजून भुरळ पडलेली गावं...पण विचार शक्ती बंद पडून मेंदू चा भुगा करून घेतलेलीजाती अहंकाराने बरटलेली गावं....!अजूनही निर्धन, निराधारांच्या निर्धनाच्या वस्तीवर चालूनजाणारी गावं...अजूनही महामानवांची अपमान करणारी बिनडोक बनत चाललेली गावं.....स्वार्थीसाठी कुणा आडमुठालाहीपुन्हा पुन्हा सरपंच करणारी गावं...भावा भावा लाव्या दुव्या करुनराजकारण खेळणारी गावं... प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर ही काहीच न त्यास कळणारी गांवं...विचाराने शेंबड्याच्या मागेच शेवटी वळणारी गावं...&nb...
‘त्या सायकलच्या घंटीत दडलेलं प्रेम ; पोस्टमन काकांच्या आठवणींतून!’
Editorial

‘त्या सायकलच्या घंटीत दडलेलं प्रेम ; पोस्टमन काकांच्या आठवणींतून!’

'त्या सायकलच्या घंटीत दडलेलं प्रेम ; पोस्टमन काकांच्या आठवणींतून!'आजच्या डिजिटल युगात एक क्लिक पुरेसं असतं संदेश पोहोचवण्यासाठी, फोटो शेअर करण्यासाठी, किंवा कोणाचं हसतंय का रुसलंय हे जाणून घेण्यासाठी. पण कधी विचार केला आहे का, त्या एका क्लिकमुळे आपण काय गमावलंय? आपण हरवलोय त्या सायकलच्या छोट्याशा घंटेचा आवाज, जो ऐकला की अंगावर रोमांच उभे राहायचे कारण तो आवाज असायचा पोस्टमन काकांचा!तेच पोस्टमन काका… भर उन्हात, मुसळधार पावसात, वाऱ्याच्या झंझावातातही आपली जबाबदारी निभावणारे. त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची एक रेष सुद्धा नसायची. हातात बॅग, खांद्यावर पत्रांची गाठडी आणि सायकलला लटकलेली लहानशी घंटी पण ती घंटी म्हणजे एखाद्या घरासाठी आनंदाची वर्दी!त्या काळात पत्र म्हणजे फक्त एक कागद नव्हता. ती असायची भावना, प्रेम, आपुलकी आणि आठवणींचं मूर्त रूप. त्या कागदावर उमटलेले शाईचे ठिपके म्हणजे को...
एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळी
News

एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळी

एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळीएकतेचा संदेश देत शकुंतला रेल्वे स्टेशनवर एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या ३७व्या प्रतीकात्मक जनआंदोलनातून ही दिवाळी सामाजिक एकतेचा दीपोत्सव ठरली. दिवाळीचा उत्सव सामान्यतः प्रत्येकजण आपल्या घरात साजरा करतो; परंतु या वेळेस नागरिक, महिला, बालगोपाल, व्यापारी आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन रेल्वे स्टेशन परिसरातच आनंदोत्सव साजरा केला. विषमतेचा अंधार दूर करून एकतेचा प्रकाश जागविण्याच्या हेतूने शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने हा अभिनव उपक्रम हाती घेतला.अचलपूर रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजता स्वच्छता अभियानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, माहेर फाउंडेशन, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, जमात-ए-इस्लामिक महिला संघटन, मानव सेवा समिती, व्य...
आठवणीतील अय्युब; माणुसकीच्या नात्याचा हात!
Story

आठवणीतील अय्युब; माणुसकीच्या नात्याचा हात!

आठवणीतील अय्युब; माणुसकीच्या नात्याचा हात!दुपारच्या सत्रात फोन खणानला.. नंबर सेव्ह नसल्याने मी बराच वेळ वाजणाऱ्या बेल कडे बघत होतो. ट्रु कॉलर ने त्याचं काम चोख बजावले होते. नंबर जरी अननोन असला तरी अयुब अयुब असं काहीतरी ट्रु कॉलर स्पष्टपणे दिसत होते. शेवटी अगदी शेवटचा आचका घेऊन मोबाईल बंद होणार त्या शेवटच्या क्षणाला कॉल रिसीव्ह केला. तिकडून आवाज आला.. कोण बाबासाहेब भहुहे का..? मी फक्त हं.. केलं भाऊ मी अय्युब बोलतोय...! मी आपला मेंदूला जरा जोर देत विचार करू लागलो की, कोण अय्युब यार..? खरं तर अय्युब कोण..? हे काही माझ्या लवकर लक्षात येईना. बरं समोरच्याला मी तुम्हाला ओळखत नाही असंही म्हणू शकत नव्हतो.. या सर्व विचारात काही सेकंदाचा वेळ गेला. आणि समोरून तोच व्यक्ती बोलता झाला.. कदाचित त्याला ही कळलं असावं की मी त्याला ओळखलं नाही.. पुन्हा तोच बोलता होत म्हणाला की, अरे हो.. तुम्ही कस्काय मला ध...
भावाबहीणीचं नातं..!
Poem

भावाबहीणीचं नातं..!

भावाबहीणीचं नातं..!ओवाळणीच्या ताटातनोटा टाकून झाल्यावर……..त्याने तो कागद पुढे केलाआणि लहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला…ताई इथं तुझी सही हवीय फक्त…तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवलापदराने डोळे पुसत हसत म्हणाली,आण तो कागददादा सही करतेफक्त एक वचन देऊन जावर्षभर आला नाहीस तरी चालेलदर भाऊबिजेला न चुकता येत जा..माय बाप गेलंआत्ता माहेरही रुसलं आहे..मातीतल्या नात्याचंनावही पुसलं आहे..मुलांना चांदोमामाची तीरोज गोष्ट सांगते..मुलं झोपी जातात तेव्हा..तिच्या डोळ्यात जत्रामाहेरची पांगते..सुखी ठेव देवा भाऊराया माझानवस रोज मागते..किती किती आणि कितीतरीभावाचं कौतुक सांगते सासरी..अन तिच्या माहेरात फक्त तिचीवाट पाहते ओसरी…-नितीन चंदनशिवे● हे वाचा –Dr Sujay Patil : ...
गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा
Article

गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा

गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसादिवाळी हा भारतीय संस्कृतीत समृद्धी, आनंद आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. मात्र गोरबंजारा समाजातील ‘दवाळी’ ही फक्त एक सण म्हणून नव्हे तर सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. या सणाचे संदर्भ विधी, लोकगीते आणि परंपरा, समाजाच्या भटक्या इतिहासाशी, निसर्गाशी आणि सामूहिक जीवनाशी घट्ट जोडले गेलेले आहेत.गोरबंजारांची ‘दवाळी’ दोन दिवसांची असली तरी तिचा आशय शतकानुशतकांचा सांस्कृतिक वारसा सांगतो. पहिल्या दिवशी कुमारिका मुली परंपरेनुसार घराघरांत जाऊन दिवा घेऊन ‘मेऱा’ च्या रुपाने थोरामोठ्यांचे शुभचिंतन करतात आणि पारंपरिक गीतांद्वारे समृद्धीचे आशीर्वचन मागतात. या विधीत समाजातील स्त्रीशक्ती आणि एकात्मतेची जाणीव स्पष्ट दिसते. दुसऱ्या दिवशी पार पडणारी ‘गोधन पूजा’ पशुधन आणि निसर्गाबद्दल गोरबंजारांचा कृतज्ञतेचा उत्सव ठरतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी होणारी ह...
‘ताई कितीला दिला हा फडा?’ ; श्रमाच्या किंमतीचा हृदयस्पर्शी अर्थ
Story

‘ताई कितीला दिला हा फडा?’ ; श्रमाच्या किंमतीचा हृदयस्पर्शी अर्थ

'ताई कितीला दिला हा फडा?' ; श्रमाच्या किंमतीचा हृदयस्पर्शी अर्थ"ताई कितीला दिला हा फडा?" " भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला" त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला "दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?" " भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून" मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने. त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला. रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे. " भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले" "अहो ताई मी किंमत कमी करनार नाही " त्या रखुमाईल...
अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेश
Article

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेश

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेशदिवाळीत केवळ भौतिक दिवे न लावता प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात प्रेम, करुणा आणि सौहार्दाची ज्योत पटवण्याचा हा सण आहे.दिवाळीचे खरे महत्त्व फक्त दिवे लावणे किंवा मिठाई खाणे एवढेच मर्यादित नाही. हा सण आपल्या जीवनात ज्ञान, सकारात्मकता आणि समृद्धी आणण्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये दिवाळीचे वर्णन अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा त्रिपक्षीय विजय म्हणून केले आहे. हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या मानसिक आणि सामाजिक जीवनात संतुलन आणि प्रेरणा आणणारा सण आहे. दिवाळीच्या वेळी आपल्या घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये दिसणारा तेज आणि उत्साह केवळ शारीरिक प्रकाश नसून आपल्या जीवनात आध्यात्मिक आणि मानसिक प्रकाश पसरवण्याचे प्रतीक आहे.या दिवाळीत "मानवतेची ज्योत पटवण्याचा" संकल्प करू या.हा स...
घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर – वंशावळीच्या प्राचीन सरीतून
Article

घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर – वंशावळीच्या प्राचीन सरीतून

घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर - वंशावळीच्या प्राचीन सरीतूनबाईपणाचा हिरवा गर्भ ठेवणाऱ्या ओसाड पुरुषी माळरानाला अन् काळाच्या पाठीवर अख्खा जन्म सहनशीलतेने सारवून – लिंपून जगण्याचा पापुद्रा धरून आलेल्या बाई कुळाला… अशा गर्भित अर्थाने अर्पण केलेली “वंशावळीच्या प्राचीन सरीतून…” ही नांदगाव जि नाशिक येथील कवयित्री प्रतिभा खैरनार यांची साहित्य काव्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. स्त्री जीवनाची वास्तवता मांडणारी ही कलाकृती साहित्य जगतात स्त्रीवादी लेखनातील मैलाचा दगड ठरावी इतकी दर्जेदार निर्मिती झाली आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर स्त्रीचा अर्धा पदराने झाकलेला चेहरा, माथ्यावर चोचीत गवताच्या काड्या घेऊन बसलेली चिमणी, हा संदर्भ पाहूनच स्त्रीच्या शालीनतेचे, सोशिकतेचे, सहनशीलतेचे, कुटुंबवत्सलपणाचे, स्त्रीसंस्कृतीचे दर्शन घडते. महाराष्ट्राचे प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी साकारलेल्या मुक्त...