एक ध्येयवेडा समाजसुधारक- महात्मा फुले
विद्ये विना मती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना रुद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केलेअशी आपल्या काव्यातून बहुजन समाजाची विदारक परिस्थिती मांडणारे, एक उत्कृष्ट लेखक विचारवंत महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन. ज्या व्यक्तीने शेतकरी, शेतमजूर, बहुजन समाज, स्त्री शिक्षणासाठी आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली त्या व्यक्तीला आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. 'सत्यशोधक समाज' नावाची संस्था स्थापन करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम महात्मा फुलेंनी गेले. आपल्या मुलाचा महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह फुलेंनी आपल्या पत्नीच्या सहकार्याने लावला. कारण दत्तक पुत्र यशवंत हा विधवेचा मुलगा असल्याने समाज त्या मुलाला डावलून मुलगी देत नव्हता, पण फुले दांपत्याने दत्तक मुलाला न्याय मिळवून दिला. व समाजापुढे सर्वधर्मसमानतेचा आदर्श निर्माण केला.ज...

