Tuesday, March 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
‘रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल’
Article

‘रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल’

'रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल'युवा साहित्यिक अशोक पवार लिखित '…आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी वाचण्यास नुकतीच हाती घेतली. सदर कादंबरीस आयकर उपायुक्त विष्णू औटी यांची आशयगर्भी प्रस्तावना मिळालेली असून ज्येष्ठ साहित्यिक, संजय पठाडे यांची वाचकांच्या काळजास हात घालणारी दमदार पाठराखण लाभलेली आहे. मुखपृष्ठ इतके बोलके आहे की, कादंबरीच्या अंतरंगात कोणकोणते सहस्य दडलेले आहे हे पाहण्यासाठी वाचकांचे मन क्षणात भरारी घेते.मनात असलेली जिद्द धगधगत्या मशालीसारखी सदैव पेटती ठेवल्यास आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्यास दहा हत्तींचे बळ देवून जाते. परिस्थिती माणसाला अनेकदा निराश करू शकते, परंतु पराजीत करू शकत नाही. हा या कादंबरीचा मूळ गाभा आहे. जर आपल्या डोळ्यांत स्वप्न असेल आणि काळजात जिद्द असेल, तर कोणतीही अडचण यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकत नाही. हा संदेश देण्यात ही ...
‘किनारे सरकत आहे’ : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशन
News

‘किनारे सरकत आहे’ : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशन

'किनारे सरकत आहे' : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशनगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : प्राध्यापक सतेश्वर मोरे स्मृती प्रतिष्ठान व डीऑन पब्लिशिंग हाऊस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "किनारे सरकत आहे" या आंबेडकरी गझल संग्रहाचे प्रकाशन सोहळा १० ऑगस्ट २०२५, रविवारी दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमटेकडी परिसर, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.गझलकार नंदकिशोर दामोदरे 'नंदा' यांनी लिहिलेल्या या संग्रहात सामाजिक वास्तव, तळागाळातील वेदना आणि परिवर्तनाची आंबेडकरी प्रेरणा उमटलेली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय घरडे असून, प्रमुख अतिथी म्हणून अरुण भी विघ्ने, डॉ. मनोज सोनवणे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे संचालन रोशन गजभिये करणार आहेत.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदादुपारी दोन वाजता "आंबेडकरी गझलप्रज्ञा...
ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!
Article

ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!

ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील विजिगीषु वृत्ती जागृत करणारी ' आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी नुकतीच माझ्या वाचनात आली.मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये क्लिअरिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या अशोक पवार या हरहुन्नरी तरुणाने या प्रेरणादायी कादंबरीचे लेखन केलेले आहे.दुष्काळ पाचवीला पुजलेल्या पारनेर सारख्या दुष्काळी भागातील एका छोट्या गावातील एका जिद्दी तरुणाची ही कथा आहे.खरं तर स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ आहे.१०..१५ वर्षांपूर्वी शहरातील तरुणांचीच ती मक्तेदारी होती.पण हळूहळू ग्रामीण भागातील तरुणांना या परीक्षेने भुरळ घालायला सुरुवात केली.दुर्दम्य इच्छाशक्ती,जबर मेहनत करण्याची वृत्ती आणि ध्येयवेडे होऊन यशाला गवसणी घालणारा टोकाचा आत्मविश्वास या बळावर ग्रामीण भागातील तरुणांन...
‘जनतेची झळ, सत्तेचा खेळ’
Editorial

‘जनतेची झळ, सत्तेचा खेळ’

'जनतेची झळ, सत्तेचा खेळ'सध्याचा महाराष्ट्र पाहिला, तर मनात अनेक प्रश्न उभे राहतात. शहरं वाढतायत, पण शेतामधून पाणी ओसरतंय. राजकारण गडबडलंय, पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरं मात्र अद्याप धूसरच आहेत. महागाईच्या दरांनी सामान्यांचे बजेट कोलमडले आहे, तर शेतकरी आकाशाकडे पाहून पावसाच्या आल्या-न आल्याच्या बातम्या ऐकत हातात माती चोळतो आहे. एका बाजूला सत्तेची समीकरणं बदलत आहेत, शिंदे-फडणवीस-पवार यांचे युती–वियोगाचे राजकारण जनतेला रोज नवा तमाशा दाखवत आहे. विधानसभेचे वातावरण रणांगणासारखे आहे, आणि गावपातळीवर प्रश्न अजूनही तसेच पिण्याच्या पाण्याचा अभाव, रस्त्यांची खडबडीत अवस्था, आरोग्य केंद्रांची उणीव, आणि रोजगाराच्या संधींचा अभाव.कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालंय, तर विदर्भात पाऊस फसला आणि शेतकरी पुन्हा नैराश्याच्या कडेलोटावर.मराठवाड्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई, आता पाव...
साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!
Article

साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!

साहित्यसूर्याला विनम्र अभिवादन.!ज्यांच्या लेखणीने मराठी भाषेतील साहित्य सातासमुद्रापार अजरामर झाले. आपल्या झुंजार लेखणीने तळागाळातील कष्टकरी, शोषितांच्या व्यथा साहित्यातून मांडणाऱ्या जन नायकाचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगावी झाला. ते साहित्यसूर्य अण्णाभाऊ साठे होय. त्यांनी साहित्यातली सर्व प्रकार लिहिले आहेत. नवलाईची गोष्ट ही की, फक्त दिड दिवस शाळा शिकून वैश्विक,परिवर्तनवादी, सामाजिक, विचार आपल्या साहित्यातून व्यक्त केले.खरे तर अण्णाभाऊ साठे एक जागतिक कीर्तीचे साहित्यिक होते. परंतु इथल्या व्यवस्थेमुळे उपेक्षितच राहिले. फकिरा, वारणेचा वाघ, वैजयंती, माकडीचा माळ, आवडी, माझा रशियाचा प्रवास यासारख्या अनेक कथा, कादंबर्‍या, पोवाडे, नाटके, प्रवासवर्णन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याला, महाराष्ट्राला दिलेली अनमोल भेट आहे.अशा या महान साहित्यिकाचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला...
१८ जुलै ; पहिल्या सुपरस्टारची आठवण
Editorial

१८ जुलै ; पहिल्या सुपरस्टारची आठवण

18 जुलै ; पहिल्या सुपरस्टारची आठवण१८ जुलै. ही तारीख जगाच्या दिनदर्शिकेत एक सामान्य दिवस असू शकते, पण लाखो हिंदी सिनेरसिकांच्या हृदयात ती एक हळवी जखम उलगडते. कारण या दिवशी, २०१२ साली, हिंदी सिनेसृष्टीचा पहिला सुपरस्टार, "काका" – राजेश खन्ना यांचा आपल्यातून कायमचा निरोप झाला. त्यांचे नुसते जाणे नव्हते, तर एका भावविश्वाचं, एका नजरेत बोलणाऱ्या अभिनेत्याचं, आणि असंख्य प्रेमकथा घडवणाऱ्या चेहऱ्याचं अस्त होतं.राजेश खन्ना म्हणजे केवळ एक अभिनेता नव्हता. तो एक भावना होता. त्यांच्या अभिनयात एक सहजतेची, हळवेपणाची, आणि प्रेमळ अशा शांत प्रकाशाची सरिता वाहायची. "बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं…", हा संवाद आजही ऐकला की अंगावर काटा येतो. कारण हा संवाद फक्त "आनंद" सिनेमातील नव्हता, तो त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार होता.६० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा राजेश खन्ना रुपेरी पडद्याव...
पारनेरचा चिट्ठीवाला झाला कांदबरीकार
News

पारनेरचा चिट्ठीवाला झाला कांदबरीकार

पारनेरचा चिट्ठीवाला झाला कांदबरीकारगौरव प्रकाशन पारनेर (प्रतिनिधी) : पारनेरच्या मातीत जन्म घेऊन.पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक लोक मुंबईत जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावली आहेत .अनेकांनी मोठा नावलौकिक मिळवला आहे. त्यात अजून एक भर पडली आहे.गटेवाडी गावचे रहिवासी असणारे अशोक पवार हे साईनाथ क्लीअरिंग एजन्सी नवी मुंबई येथे काम करत असताना त्यांचा लेखन हा प्रांत नसून देखील त्यांनी , … आणी रामा कलेकटर झाला ही ३०० पांनी कादंबरी लिहली आहे.रविवार १३ जुलै रोजी खासदार निलेश लंके आणि सह आयुक्त विष्णू औटी यांच्याउपस्थितीत लेखकाच्या आई वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात कादंबरीचे प्रकाशन झाले आहे. हमाल ते कलेकटर अस कथानक असणारी कादंबरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण वर्गा साठी मार्गदर्शक ठरेल ,असे गौरव उदगार विष्णू औटी यांनी प्रकाशन सोहळ्यात बोलताना काढले. अशोक पवार यांनी आपल्या लेखनातून अस्सल पारनेरी ...
पंढरपूरची वारी म्हणजे अध्यात्मिक प्रवास…
Article

पंढरपूरची वारी म्हणजे अध्यात्मिक प्रवास…

पंढरपूरची वारी म्हणजे अध्यात्मिक प्रवास…पंढरपूर वारी ही मिरवणूक भक्तीचा एक मेळावा आहे, ज्यामध्ये लयबद्ध ढोलकी, झांझांचा आवाज आणि बासरीच्या मधुर स्वरांनी वातावरण दुमदुमून जाते.पंढरपूर वारी - ही मिरवणूक भक्तीचा एक मेळावा आहे, ज्यामध्ये लयबद्ध ढोलकी, झांझांचा आवाज आणि बासरीच्या मधुर स्वरांनी वातावरण दुमदुमून जाते.पंढरपूरची वारी ही केवळ एक यात्रा नाही; ती महाराष्ट्राच्या खोलवर रुजलेल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा जिवंत पुरावा आहे. भगवान विठोबाच्या सन्मानार्थ लाखो लोक पवित्र मार्गांवर चालत असताना, ते शतकानुशतके जुन्या भक्तीच्या सामूहिक कृतीत सहभागी होतात. दंतकथा आणि विधींनी समृद्ध असलेले हे तीर्थस्थान, भक्तांना नम्रता, संगीत आणि श्रद्धेच्या सुसंवादी मिश्रणात एकत्र करते, भक्ती चळवळीचा चिरस्थायी वारसा आणि दैवी प्रेमाच्या परिवर्तनीय शक्तीचा उत्सव साजरा करते.पंढरपूरची वारी, एक अल...
मानलं माणसा तुला.!
Article

मानलं माणसा तुला.!

मानलं माणसा तुला.!एअर इंडियाचं एक फ्लाईट अहमदाबाद वरून लंडनसाठी २४२ प्रवासी घेऊन हवेत झेपावलं. खूप मोठ्या उम्मेदी घेऊन २४२ प्रवासी लंडनसाठी निघाले आणि काही सेकंदामध्ये ते कोसळले. आपला भारत देशच काय संपूर्ण विश्वच ह्या उडानाने स्तब्ध झाले.  आता ह्या घटनेची मीमांसा होते आहे. तर्क वितर्क होत आहेत, सांगितले जात आहे. जी काही घटना घडली ती खूपच वाईट घडली. फ्लाईटचे नाव होत ड्रीमलाइनर. आपण ह्याला आपल्या स्वप्नांची पूर्ती करणारा म्हणू. 'उंच झेप घेरे पा...
लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन
News

लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन

लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहनगौरव प्रकाशन अमरावती | १6 जून २०२५नाशिक येथे १५ जून २०२५२०२५ रोजी पार पडलेला आकाश गायगवळी (जळका, शहापूर – अमरावती) आणि मेनका वाघ (नाशिक) यांचा विवाह समाजातील पारंपरिक रूढी व अंधश्रद्धांना छेद देणारा ठरला. लग्नानंतर १६ जून रोजी शहापूर तालुक्यातील जळका गावात आयोजित स्वागत समारंभात डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी या विवाहाचे कौतुक करत स्पष्टपणे आवाहन केले – "लग्नातील अनिष्ट परंपरा व अंधश्रद्धा नष्ट करा!"या विवाहात पारंपरिक ‘हळदी समारंभ’ घेण्यात आला नाही. विवाहपत्रिकेतच याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. याशिवाय, वधू मेनका वाघ यांनी परंपरेतील काळे मणी नसलेले मंगळसूत्र परिधान करत सामाजिक संकेतांना आव्हान दिले.डॉ. मुन्द्रे म्हणाले, "काळे मणी न घालता देखील मंगळसूत्र पूर्ण असू शकते, हे या दोघा...