हिवराची झाडं, तरसाची गुफा आणि बालपणीच्या आठवणी
हिवराची झाडं, तरसाची गुफा आणि बालपणीच्या आठवणीशहानुर नदीच्या काठा,काठानं नदीथडीनं हिवराची ही दाट झाडं दृष्टीस पडायची.मधुकर डॉक्टर यांच्या थडीपासून तर रंगराव भदे पोलिस पाटील यांच्या वावरा पर्यंत नदीकिनारी आमचं खेळायचं साम्राज्य असायचं. बंगाली बाभुयांनी दाट झाकलेला भाग,थडीकाठानं जंगली श्वापदे व तरसाच्या मोठमोठ्या गुफा.ही तरसं रात्री शिकारीसाठी बाहेर पडायची.व दिवसा या दाट अडचणीच्या गुफेत दडून बसायची. बादशहा भाईच्या मईच्या वावरात मुंगाच्या शेंगा तोडल्यावर ताण काट्यावर मोजण्यासाठी डोक्शावर घराकडे पोतं आणतांना गोविंदराव साधुबुवांच्या मोठ्या पसरलेल्या नाल्या जवळ सगर रस्त्यावर वाढलेल्या गावरानी कडब्यातून वाट काढतांना कधीकधी ती समोरून पळून जायची.गाढवा सारखी उंची वाघासारखे पसरट पट्टेदार मोठ्ठं तोंड खुप भिती वाटायची.एक दोघं सोबतीला असले म्हणजे जाण्याची हिमंत यायची. एकदा तर सखाराम महाराजा...









