Tuesday, March 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोध
Article

अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोध

अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोधअल्मोन स्ट्रॉजरची प्रेरणादायी कहाणी1889 मध्ये अमेरिकेतील Kansas City येथे घडलेली एक घटना आज जगाच्या टेलिफोन उद्योगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. साधा Undertaker असलेल्या अल्मोन स्ट्रॉजर (Almon Strowger) याने व्यावसायिक स्पर्धेतून प्रेरणा घेऊन Automatic Telephone Exchange आणि Rotary Dial Phone चा शोध लावला.स्पर्धकाची पत्नी बनली अडथळात्या काळी Kansas City मध्ये फक्त दोन Undertaker होते. तरीदेखील सर्व ग्राहक दुसऱ्याकडेच जात होते.एका दिवशी स्ट्रॉजरच्या मित्राने त्याला सांगितलं –“मी तुला कॉल केला होता, पण टेलिफोन एक्सचेंजवरच्या महिलेने सांगितलं की तुझा फोन व्यस्त आहे. मग तिने मला थेट दुसऱ्या Undertaker कडे जोडून दिलं.”हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाचौकशी केली अस...
अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब
Article

अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब

अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उबअंगण सांगे घराची कळापूर्वी कितीही छोटी घरे असली तरी त्यांच्यात एक साम्य होते, ते म्हणजे प्रत्येक घराला छोटंसं का होईना पण अंगण असायचं.आता काळाच्या ओघात अंगण नावाचं घर नामशेष होत चाललं आहे.जी काही थोडीफार अंगणे उरली आहेत त्यांनी ही आपापली सीमा कुंपणात बंदिस्त करून घेतली आहे.म्हणजे त्यात मोकळेपणा असा उरलेला नाही.पूर्वी अंगणं सजायची माणसांनी आणि बहरायची प्राजक्ताच्या सड्यांनी.उन्हाळा सुरू झाला कि वाळवणं करायची लगबग असायची अंगणात.भल्या पहाटे चुलांगण पेटून त्यावर आधन ठेवलं जायचं आणि मग तो चिक हटणं असो नाही तर मग सोऱ्याने कुरडया करायच्या असो. सगळं अंगण आया बायांनी भरून जायचं,कुणाला वेगळं आमंत्रण द्यायची कधीच आवश्यकता वाटत नसायची. अंगणासाठी सीमा ठरलेली नसायची.तशीच ती सीमारेषा माणुसकीसाठी ही नसायची.रात्रीच्या उकाड्यात तर अंगण हीच हवेशीर ...
लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!
News

लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!

लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!लातूर : लातूर जिल्ह्यातील आरक्षणाच्या संघर्षाने जिल्हा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाच्या ‘कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समाविष्ट करा’ या मागणीवर ओबीसी समाजाने तीव्र विरोध व्यक्त केल्याने दोन्ही समाजात तणावाची परिसीमा गाठली आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत कराड या युवकाने ‘ओबीसी आरक्षण संपणार’ या भीतीतून आत्महत्या केली. गावात ओबीसी समाजातील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केल्याने वातावरण हादरले आहे.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदासुरुवातीला भरत कराड यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये ‘मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे आरक्षण हिरावले जाण्याची भीती’ व्यक्त केली. तणाव शमत नाही तोच निलंगा तालुक्याच्या दादगी गावात शिवाजी वाल्मिक मेळ्ळे...
शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वी
Article

शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वी

शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वीशकुंतला रेल्वेचा ऐतिहासिक प्रवासब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेली शकुंतला नॅरो गेज रेल्वे हे विदर्भाचे वैशिष्ट्य मानले जात असे. मूर्तिजापूर–दर्यापूर–अचलपूर या मार्गावर धावणारी ही रेल्वे अनेक पिढ्यांच्या आठवणींशी जोडलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. प्रवाशांची जुन्या काळापासून असलेली एकच मागणी म्हणजे हा मार्ग ब्रॉडगेजमध्ये बदलावा. आता अखेर या मागणीला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.सात वर्षांचा अखंड संघर्ष2018 पासून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती सातत्याने हक्काची लढाई लढत होती. उपोषण, रस्ता रोको, आंदोलन अशा विविध मार्गांनी त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. 2022 मध्ये एफएलएस (फायनान्स लोकेशन सर्वे) मंजूर झाला होता, मात्र डीपीआरच्या अभावामुळे प्रकल्प रखडला. या सग...
भोज्याभाई: आमच्या गावातील पानाचा पेटारा आणि पारंपरिक नागवेली पानांचा वारसा
Article

भोज्याभाई: आमच्या गावातील पानाचा पेटारा आणि पारंपरिक नागवेली पानांचा वारसा

भोज्याभाई: आमच्या गावातील पानाचा पेटारा आणि पारंपरिक नागवेली पानांचा वारसाआमच्या गावात डोक्शावर पानाचा पेटारा घेऊन कधी पायदळ तर कधी मिळेल त्या वाहनानं दहिहांडयाचा भोज्याभाई यायचा. वयाची साठी ओलांडलेला व डोक्शावरचे केस विरळ झालेला.मळलेला सदरा,आखुड पायजामा मध्यम किडकिडीत शरीरयष्टी.दाढीचे खुंट वाढलेले,गयाभोवती लपेटलेली लाला शापी, म्हणजे आताच्या भाषेत दुप्पटं,पायात टायवरी चप्पल घातलेला असा भोज्याभाईचा अवतार होता.धर्माने मुसलमान असूनही अस्खलित पिवर मऱ्हाटी बोलायचा. तसं त्याचंच गावचं एवढं मोठं होतं की त्याले पानाचा पेटारा डोक्शावर घेऊन ईकडे तिकडे फिरायचं कामंही नव्हतं. त्याच्याच गावात त्याचा पानाचा धंदा व्हायचा. पंरतु लोकांच्या गरजा भागविण्यासाठी व आपल्यालाही दोन पैसे भेटावे या लालसेपोटी बिच्यारा दोन दिवसाआड नित्यनेमाने यायचा. बाकी दिवस आजुबाजूच्या खेड्यापाड्यात तो डोक्यावर व एक काखेत प...
विदर्भाचे सौंदर्य : नागपूर ते चिखलदरा, ताडोबा, पेंच व आनंदवनची सफर
Article

विदर्भाचे सौंदर्य : नागपूर ते चिखलदरा, ताडोबा, पेंच व आनंदवनची सफर

विदर्भाचे सौंदर्य : नागपूर ते चिखलदरा, ताडोबा, पेंच व आनंदवनची सफरनागपूरच्या आसपास विदर्भात बरेच रमणीय, प्रेक्षणीय स्थळे आहेत उदाहरणार्थ टेकडी गणपती मंदिर हे तीर्थक्षेत्र असून पर्यटन सुद्धा आहे 12 व्या शतकात हेमाद्री पंडितांनी बांधले आहेत गणेश मूर्ती 250 ते 300 वर्ष जुने आहे. 1866 स* रेल्वे स्थानकाच्या कामासाठी टेकडीचा पूर्व भाग सुरंग लावून खोदकाम सुरू असताना गणपतीची शेंदूर लावलेली मूर्ती निघाली त्यावेळी हा भाग रेंजीमेंटल असल्यामुळे अधिक खोद काम करता आले नाही.1926 झाली या मंदिराला टिनाचे शेड बांधण्यात आले 1955 स* नवीन मंदिर बांधण्यात आले. या देवस्थानाची मान्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर असून परदेशातून सुद्धा भाविक दर्शनासाठी येत असतात विदर्भातील अष्टविनायकामध्ये या गणपतीची गणना होते. जानेवारीत तीळकुंद चतुर्थीच्या दिवशी भव्य यात्रा भरते व कमीत कमी दोन लाख भाविक दर्शनास येतात.त्याच...
बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री
Article

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्रीआमच्या छोट्याशा गावात साऱ्या जातीधर्माची लोकं अगदी गुण्यागोविंदाने रहायची.गावात दहावी पर्यंत शाळा.पाच पन्नास कुणबी,पाटलांची,दहा बारा तेल्यांची ,पाच पंचवीस धनगर समाजाची वस्ती गावच्या नदीकाठावर बौद्धवाडा होता.बाकी गावगाडयाची जशीजशी लोकसंख्या वाढत गेली,तसतशी कुटूंबे मोठी झाली.काही नवीन प्लॉट पडलेल्या आखर पट्टीत शेणामातीची लिपून तर काही पक्की बांधून वस्ती करून रहायला गेली. दोनचार मुस्लिम समाजाची घरं होती. गफारभाई, व त्यांची भावडं पण गावाशी त्यांचा चांगला सलोखा होता. गफफारभाई हातात लोंखडी पाणा खांद्यावर घेऊन गावाला वॉटर सप्लाय म्हणजे नळ सोडायचे काम करायचे.दुसरा लहान भाऊ तालुक्याच्या बैलबाजारात गुरंढोर, बैलजोड्या विकण्याचा जोड धंदा करायचा. गावात अडल्या नडल्याले चांगली बैलजोडी विकत घेऊन द्यायचा.एक एसटी ड्रॉयव्हर असलेले त्यांच...
पर्यावरणविषयक घोषवाक्ये – रामदास पुजारी लिखित प्रभावी पुस्तिकेचा आढावा | पर्यावरण जनजागृती
Article

पर्यावरणविषयक घोषवाक्ये – रामदास पुजारी लिखित प्रभावी पुस्तिकेचा आढावा | पर्यावरण जनजागृती

पर्यावरणविषयक घोषवाक्ये – रामदास पुजारी लिखित प्रभावी पुस्तिकेचा आढावा | पर्यावरण जनजागृतीसेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक, कवी, लेखक रामदास पुजारी लिखित 'पर्यावरणविषयक घोषवाक्ये' ही पुस्तिका नुकतीच वाचण्यात आली. पर्यावरणाचा,भविष्याचा फारसा विचार न करता मानव आपल्या स्वार्थासाठी आज वृक्षतोड करताना दिसतो. रस्ते, औद्योगिकरण व इतर बाबींसाठी होत असलेली वृक्षतोड मानवाच्या, वन्यजीवांच्या, सृष्टीतील विविध घटकांच्या अस्तित्वासाठी व पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहे. पर्यावरणीय बदलांमुळे उद्भवणाऱ्या दुष्काळ,अतीवृष्टी, महापूर यांचे आरोग्यावर, जीवनावर होणारे परिणाम सर्वत्र प्रकर्षाने जाणवत आहेत. अशा वेळी पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी रामदास पुजारी यांनी लिहिलेली पुस्तिका खूपच प्रभावी ठरते.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाशुद्ध हवा, स्वच्छ पाणी जीवना हवेवृक्षारोपण प्रत्येकान...
शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सव
Article

शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सव

शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सवदरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त या उत्सवाला सुरुवात झाली. मात्र शिक्षक दिन हा केवळ औपचारिक सण नाही; तो समाजाच्या प्रगतीचा, संस्कारांचा आणि भविष्यनिर्मितीचा द्योतक आहे. त्यामुळेच आपण त्याकडे भविष्यवेधी उत्सव म्हणून पाहिले पाहिजे.शिक्षक हे फक्त ज्ञान देणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या विचारसरणीला आकार देतात. विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, चारित्र्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, तसेच समाजाभिमुख दृष्टीकोन रुजविण्याचे काम शिक्षक करतात. आजची विद्यार्थी पिढीच उद्याचा समाज आणि राष्ट्र घडवते, त्यामुळे शिक्षक दिन हा भविष्यातील पिढी घडविणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करणारा दिवस ठरतो.आजच्या...
चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख
Article

चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख

चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख५ सप्टेंबर हा दिवस आपल्या भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो कारण हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. राधाकृष्णन  हे उत्कृष्ट शिक्षकतज्ञ, तत्वज्ञानी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्वान होते.ते शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. जेव्हा त्यांच्या काही शिष्यानी व मित्रांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची परवानगी मागितली. त्यावर डॉ. राधाकृष्णन यांनी नम्रतेने सांगितले की, " माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी जर तुम्हाला माझा गौरव करायचाच असेल, तर तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा." त्या दिवसापासून म्हणजे ५ सप्टेंबर १९६२ पासून भारतात शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा सुरु झाली.   आजही ५ सप्टेंबर हा दिवस आपल्य...