Tuesday, March 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार
News

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणारमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर तीन टप्प्यांत घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात नेला आहे. यामध्ये मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.दिवाळीनंतर लगेच नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, त्यामुळे राज्यात राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू होणार आहे. मात्र या निवडणुकीमुळे आचारसंहितेचा कालावधी मोठ्या प्रमाणात लांबणार असून, विकासकामांना फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमहापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडलेल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ३१ ज...
आकांत
Poem

आकांत

आकांतकोण ति-हाईतजणू ऋणाईतबैसला दारात…कुणास सांगावेउपेक्षित गावेदुख-या स्वरात…क्षीण छताखालीअश्रुंच्या पखालीधडकी ऊरात…कष्टतो सर्वदाभोगतो आपदाभोळा अंधारात…ऊन रखरखदावते ओळखजीव अंकुरात…कल्लोळ गणांचापूर भावनांचाढुसे दिनरात…प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'५२-ब, साईनगर, गणेश अपार्टमेन्टजवळ,दिघोरी नाका, नागपूर- 440034(मो. 9421803498)हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!आकांत !…https://youtu.be/PRon0zORAkY?si=vYcXXOjhzldNhUDK...
नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा
News

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारामुंबई : नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच आकाशही रंगतदार होणार आहे. २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घटस्थापनेच्या दिवशी मुंबईत हलक्या सरींची शक्यता असली तरी त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण राहणार आहे.हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि विदर्भ-मराठवाड्यासह अनेक भागात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार सरींची शक्यता आहे.महामुंबई परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या सरींची नोंद झाली.ढगाळ वातावरण आणि उकाडानवरात्र व दुर्गापूजा दरम्यान ढगाळ वातावरणामुळे उकाड...
जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा
News

जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा

जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षावणी तालुक्यातील घटनेवर केळापूर न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णयगौरव प्रकाशन वणी (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेवर केळापूर येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. स्वतःच्या जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या 26 वर्षीय नराधम पुत्राला गुरुवार, दि. 18 सप्टेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या कठोर शिक्षेमुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा किती प्रभावी आहे याचा ठोस संदेश समाजात गेला आहे.घटनेचा आढावाजुलै 2021 मध्ये वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. 19 जुलै रोजी पीडिता वणी येथे मुलीकडे गेली होती. याच कारणावरून तिच्या मुलाने दोन-तीन दिवस सतत मारहाण केली. अखेर 23 जुलैच्या रात्री दारूच्या नशेत आरोपीने आईवर लोखंडी पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर ...
जेन झेड आंदोलनाचा आर्थिक कहर : नेपाळच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका
Article

जेन झेड आंदोलनाचा आर्थिक कहर : नेपाळच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका

जेन झेड आंदोलनाचा आर्थिक कहर : नेपाळच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटकानेपाळमध्ये अलीकडे झालेल्या आंदोलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे आंदोलनातून उसळलेल्या हिंसाचार जाळपोळ आणि तोडफोडीमुळे अब्जवादी रूप रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच आंदोलनामुळे जवळपास दहा हजार लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. याशिवाय दरबार स्क्वेअर, पोखरा,भैरहवा आणि चितवन सारखी प्रमुख पर्यटन स्थळेही ओस पडली आहेत. कैलास मानसरोवर यात्रेसाठी येणाऱ्यांची संख्या ही झपाट्याने कमी झाली आहे.नेपाळमध्ये सध्याचा काळ हा सहसा पर्यटन हंगाम असतो, जिथे मोठ्या संख्येने लोक भेट देण्यासाठी येतात. या काळात मोठ्या संख्येने स्थलांतरित लोक त्यांच्या देशात परततात आणि स्थानिक व्यवसाय मजबूत करतात. यामुळे नेपाळची अर्थव्यवस्था मजबूत होते. तथापि, यावेळी असे काहीही घडताना दिसत नाही. यामागील सर्वात मोठे कारण जनरल-जी चळवळ...
‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’
News

‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’

गौरव प्रकाशन पारनेर (प्रतिनिधी): पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उद्योजक संतोष पवार यांनी कै. प्रवीण पवार व कै. सुजित पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने समाजहिताचा उपक्रम राबवत शेतकरी व विद्यार्थी बांधवांना मदतीचा हात दिला. या उपक्रमामध्ये गावातील सर्व शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंप तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी समाजहिताच्या या उपक्रमाचे कौतुक करताना भावना व्यक्त केल्या. “मी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलो आहे. हजारो रुपये खर्च करून वक्ते बोलावण्यापेक्षा गावातील गरजू शेतकरी व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. संतोष पवार यांनी दाखवलेला हा मार्ग समाजासाठी दीपस्तंभ ठरेल,” असे दाते यांनी सांगितले.या कार्यक्रमाला तालुका भाजप अध्यक्ष राहुल शिंद...
20 वर्षे जुनी गाडी चालवण्यासाठी नवे नियम : दुप्पट शुल्क, फिटनेस टेस्ट आणि ग्रामीण भागाला दिलासा
News

20 वर्षे जुनी गाडी चालवण्यासाठी नवे नियम : दुप्पट शुल्क, फिटनेस टेस्ट आणि ग्रामीण भागाला दिलासा

नवी दिल्ली : वीस वर्षे जुनी गाडी रस्त्यावर ठेवण्यासाठी आता वाहनमालकांना काही महत्त्वाच्या अटी पाळाव्या लागणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने ठरवलेल्या नव्या नियमांनुसार 20 वर्षे पूर्ण केलेल्या वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरण आणि फिटनेस टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.यासाठी वाहनमालकांना नेहमीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागणार असून स्वतंत्र फिटनेस तपासणीही होणार आहे. इंजिन, ब्रेक, टायर, लाईट यासह वाहनाच्या प्रत्येक भागाची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रदूषण उत्सर्जन (PUC) निर्धारित निकषांनुसार आहे का हे तपासले जाणार आहे. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच वाहन रस्त्यावर धावू शकेल.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!खासगी वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क जास्त असणार आहे, तर व्यावसायिक वाहनांसाठी आणखी कडक अटी लागू होणार आहेत. शहरी भागात वाढत्या प्रदूषणामुळे हे नियम कडकपणे राबवल...
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिका
Article

बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिका

बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिकाबंजारा समाजाचे मूळ खूप प्राचीन काळात आहे.काही संशोधकांच्या मतानुसार बंजारा लोक मूळ राजस्थानातून स्थलांतरित झाले.बंजारा समाज "लदेणीकार" म्हणून ओळखला जात होता.त्यांनी मीठ,धान्य,धातू,वस्त्रे इत्यादी वस्तू गावोगावी,राज्यात परराज्यात पोहोचवल्या.भारतातील अनेक राजाच्या युद्धकाळात बंजारा समाजाने सैन्याला रसद पुरवली.कालांतराने ब्रिटिश काळात रेल्वे आल्यामुळे गोरमाटी समाजाचे पारंपरिक व्यवसाय बंद पडले.त्यामुळे समाज आर्थिकदृष्ट्या खालावला.कमकुवत बणत गेला.इंग्रजानी बंजारा समाजावर "गुन्हेगारी जमात" अशी शिक्कामोर्तब करणारे कायदे केले.त्यामुळे समाज आणखी मागे पडल.स्वातंत्र्यानंतरही स्थिरता,शिक्षण,शासनाच्या योजना यापर्यंत समाज पूर्णपणे पोहोचू शकला नाही.स्वातंत्र्याची फळे यांना चाखता आली नाही.म्हणूनच बंजारा समाज आजही वंचित आ...
अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजय
News

अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजय

अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजयअखेर शकुंतला रेल ब्रॉडगेज प्रकल्प मार्गी | अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वे प्रवासाची नवी दिशागौरव प्रकाशनAmravati News अमरावती (प्रतिनिधी) : गेल्या सात वर्षांपासून आंदोलनाच्या ज्वाळांवर उभी असलेली शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अखेर यशाच्या मार्गावर पोहोचली आहे. शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे डीपीआर (Detailed Project Report) मंजूर झाला असून अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेच्या भवितव्याला आता नवी दिशा मिळाली आहे.सात वर्षांचा सत्याग्रह अखेर फळाला2018 साली सुरु झालेल्या या लढ्याने आज ऐतिहासिक यश मिळवले. सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर समितीने सरकारचे लक्ष वेधून घेतले. या काळात रेल्वे विभागाला सातत्याने पत्रव्यवहार, मोर्चे, उपवास व विविध अहिंसक मार्गांनी आं...
बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा
Article

बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा

बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथाचांगलं आठवतंय. होय अगदी चांगलं आठवतयं. अन् आठवतंय म्हणून स्वत:ची लाजही वाटतीये. तेव्हा मी कॉलेजला होतो. अभ्यास करायचो, पण अभ्यासापेक्षा उनाडक्या जास्त करायचो. उनाडक्या करायला पैसा लागायचा. अन् पैसा कमवायची तर काही अक्कल नव्हती. म्हणून मग वडलांबरं खोटं बोलायचो अन् त्यांच्याकडून पैशे उकळायचो.बाप आमचा अडाणी. म्हणजे तसा शिकलेला. एसटीत कंडक्टर. पण, नाकाच्या सरळ रेषेत चालण्याची सवय असल्यानं बाकी भानगडीत पडत नव्हता. पोरगा मोठ्या कॉलेजला शिकतोय याच्यातच त्यांना मोठं समाधान वाटायचं. मग, उसणंपासणं कर, उपाशी राहून डबल ड्युटी कर असलं काय काय करुन ते मला पैशे द्यायचे अन् मग मी पोरांसोबत पिक्चरला जायचो. फिरायला जायचो. पोरी फिरवायचो.एकदा तर एक पोरगी म्हणाली, ‘तुझे वडील काय काम करतात?’ तर ते कंडक्टर आहेत, हे मला सांगायला लाज वाटली. म्हणून मी ति...