Tuesday, March 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात ! धाराशिवचा VIDEO व्हायरल
News

शेतकरी अडकले पुरात, अधिकारी नाचगाण्यात ! धाराशिवचा VIDEO व्हायरल

धाराशिव: मराठवाड्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. धाराशिव, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकं, घरं आणि जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक कुटुंबं उघड्यावर पडली आहेत, तर शेतकरी घरदार सांभाळण्यासाठी धडपडत आहेत.अशा वेळी नागरिकांना प्रशासनाची मदत अपेक्षित असताना, धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा नाचगाण्याचा व्हिडिओ समोर आला. हा कार्यक्रम तुळजापूर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी फक्त उपस्थिती लावली नाही, तर गाण्यांवर ठेका धरतानाही दिसल्या, आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.घटस्थापनेच्या रात्री आणि त्यानंतरच्या दिवसांत आलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र पुराचे दृश्य दिसत होते. शेतकरी पिके, जनावरं आणि घरं पाण्यात बुडत होती, पण त्याच दि...
अभंग
Poem

अभंग

अभंगवीटेवरी उभा, फक्त उगामुगाकां असा कोडगा, पांडूरंगा?निसर्गाचा कोप, लागेना गा झोपसदा रीपरीप, जीवघेणीजिथे तिथे पूर, हरवले सूरभरले संसार, धारातीर्थीपीकेही उध्वस्त, गेली घरेदारेउरलेले सारे, भांबावलेउसवलं सारं, लागेना ठिगळआमुची आबाळ, आम्हा ठावेआषाढी कार्तिकी, कासयासि यावेउगीच कां गावे, नाम तुझेसोड आता वीट, कर काहीतरीनावाचाच हरी, नको होवू-आबासाहेब कडू----------------------------हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज----------------------------नम्र निवेदन"निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…"लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उत...
आरक्षणाचा मूलभूत हेतू समजून घेण्याची वेळ.!
Editorial

आरक्षणाचा मूलभूत हेतू समजून घेण्याची वेळ.!

आरक्षणाचा मूलभूत हेतू समजून घेण्याची वेळ.!गेल्या काही दिवसांत खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत आरक्षणासंबंधी केलेले विधान समाजात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. "उद्या जर माझ्या मुलाने आरक्षण मागितले तर मला लाज वाटली पाहिजे" असे त्या म्हणाल्या आणि लगेचच या विधानावर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. सुळे या संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खासदार म्हणून ओळखल्या जातात, त्यांचा राजकीय व सामाजिक वावर नेहमीच परिपक्व भासतो, पण आरक्षणावरील त्यांचे मत हे अर्धवट सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवणारे आहे असे म्हणावे लागेल.आरक्षण हा विषय केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. तो आपल्या समाजाच्या असमान रचनेशी जोडलेला आहे. शेकडो वर्षांपासून जातीच्या नावाखाली लाखो लोकांना शिक्षण, व्यवसाय, जमीन, प्रतिष्ठा, समाजातील समान स्थान या सर्व हक्कांपासून दूर ठेवले गेले. गावकुसाबाहेर झोपड्या...
पंचनाम्याचं नाटक थांबवा – शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई द्या
Article

पंचनाम्याचं नाटक थांबवा – शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई द्या

पंचनाम्याचं नाटक थांबवा – शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई द्यामहाराष्ट्रात पावसाचा धिंगाणा चालू आहे.पंचायतराज , नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहे. मतदाराना गोंजारण्याचं काम सध्या नेते करत आहे. शेतकऱ्यांचं नुकसान पहाणी करण्यासाठी नेते बांधावर जात आहेत. प्रगत महाराष्ट्रातील प्रगत नेत्याची धावपळ सुरु आहे. नेत्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र एक प्रगत राज्य. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एकच राज्य ;पण याच राज्यात आज शेतकरी ढसाढसा रडतोय. अनेकांची संसार उद्धवस्त झालेली आहेत. कांहीची जणावरे वाहून गेलीली आहेत.काहीजण पूरात वाहून गेलेत.कारण आहे राज्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचं संकट.एक संकट ओसरत नाही,तोवर दुसरं संकट आ वासून उभा राहतोय.येथे कधी अतिवृष्टी,कधी दुष्काळ,तर कधी गारपीट व वादळामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत राहतेय.मग जगाचा पोषिंदा लाचार होव...
14 तास झाडावर बसून पुराशी झुंज – केवड येथील ज्येष्ठाची मध्यरात्री थरारक सुटका
News

14 तास झाडावर बसून पुराशी झुंज – केवड येथील ज्येष्ठाची मध्यरात्री थरारक सुटका

माढा (प्रतिनिधी) : माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे केवड गावात एक थरारक प्रसंग उभा राहिला. येथील ज्येष्ठ नागरिक कुबेर नामदेव धर्मे हे तब्बल १४ तास झाडावर बसून जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत राहिले. शेवटी मंगळवारी मध्यरात्री ११:५० वाजता रेस्क्यू टीमने ७५ किलोमीटरचा प्रवास करून त्यांची सुखरूप सुटका केली.सकाळपासून अडकलेले संकटातमंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून कुबेर धर्मे हे पूरग्रस्त भागात अडकून पडले. वाढत्या पाण्यामुळे त्यांनी जवळच्या झाडावर आश्रय घेतला. नदीच्या पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता की गावकऱ्यांना त्यांना मदत करणे शक्यच झाले नाही.मोबाईल आणि ड्रोनच्या मदतीने शोधधर्मे यांनी स्वतःच्या मोबाईलवरून काही लोकांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने ड्रोन कॅमेराचा वापर करून त्यांचा शोध घेतला. झाडावर अडकलेले असल्याचे स्पष्ट झाल्यावर लगेच रेस्क्यू टीमला खबर देण्या...
अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
Article

अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणीअमरावती : ओबीसी आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत दोन ओबीसी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसी आरक्षण संघर्ष समितीचे चंद्रशेखर देशमुख व तुषार वाढवणकर हे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून त्यांनी शासनाविरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.प्रमुख मागण्या२ सप्टेंबर २०२५ चा शासन निर्णय रद्द करावा – मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करणारा निर्णय मागे घ्यावा.शिंदे समितीच्या ५८ लाख कुणबी नोंदणीची पडताळणी करण्यासाठी उच्चस्तरीय उपसमिती नेमावी.ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सध्याच्या ५० टक्क्यांवरून १०० टक्के करावी.जातीनिहाय जनगणना तात्काळ सुरू करावी.महा-युती सरकारने भरपाई निधी ओबीसी समाजाला उपलब्ध करून द्यावा.संघर्ष समितीचा इशाराराज्य सरकारने या ...
बुलढाण्यात पालकमंत्री गायब? राष्ट्रवादीची पोलिसांत आगळीवेगळी तक्रार
News

बुलढाण्यात पालकमंत्री गायब? राष्ट्रवादीची पोलिसांत आगळीवेगळी तक्रार

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून प्रचंड पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी कोणतीही ठोस दखल घेतली नाही, असा आरोप करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत आगळीवेगळी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांना शोधून देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत आणि शेतकऱ्यांच्या दुःखाला कोणी न्याय देणार, असा प्रश्न या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजतक्रारीनंतर सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले :"शासनाचा वेळ आल्यावर दुसऱ्याच दिवशी मी बुलढाण्यात होतो...
श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्या
Article

श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्या

श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्यामागील आठवड्यामध्ये नेहमीप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरात गेले असता एका महिलेने पुजाऱ्यास विचारले की,"गुरुजी ही लिंबाची माळ देवीला का बरे घातली आहे देवीच्या गळ्यात? अशी माळ याआधी तर कधी पाहिली नव्हती. तेव्हा गुरुजी म्हणाले," कुणी काही नवस केला असेल तर घालतात ते अशी लिंबाची माळ. त्यावर ती उत्तरली दक्षिणात्य मंदिरांमध्ये देवीला लिंबाची माळ घातल्याचं बघितले आहे, ऐकलं आहे परंतु तुळजाभवानीला लिंबाची माळ प्रथमच मी बघते आहे. त्यावर ते म्हणाले, "क्रोधित झाल्यानंतर शरीर तापते. लिंबू थंडावा आणि तरतरी देणारे गुणकारी फळ असल्याने भगवतीचा क्रोध शांत व्हावा तिला थंडावा मिळावा म्हणूनही लिंबाची माळ घातली जाते असे म्हटले जाते".गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!तसं बघितलं तर लिंबू हे गुणकारी असते. ते थंड आणि तरतरी देणारे फळ. शरीराला थंडावा मिळ...
विलासराव माहुरे : गोरगरिबासाठी आशेचा किरण आणि निष्ठावंत शिवसैनिक
Article

विलासराव माहुरे : गोरगरिबासाठी आशेचा किरण आणि निष्ठावंत शिवसैनिक

विलासराव माहुरे : गोरगरिबासाठी आशेचा किरण आणि निष्ठावंत शिवसैनिकएक उत्तुंग अनं कृतिशील व्यक्तिमत्व म्हणून विलासराव माहुरे यांच्या कार्यकर्तुत्वाच्या बाबतीत महाविद्यालयीन जीवनापासून अनुभवले अनं कालांतराने त्यांच्यातील अनेकविध कार्यकर्तुत्वाचे पैलू उलगडत गेले.ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आणि एक खंदा अनं समाजाचे दुःख वेचणारा शिवसैनिक म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाची अनुभूती यायला लागली.शिक्षकी पेशातील शिस्तप्रिय वडिलांच्या तालमीत तयार झालेल्या संस्कारक्षम विलासरावांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला शिरोधार्य मानून ना मागचा विचार केला ना पुढचा विचार,ना कुटुंबाचा ना वैयक्तिक आयुष्याचा विचार केला.शिवसेनेची भगवी पताका हाती घेऊन राजकीय सामाजिक व विविधांगी कार्यासाठी शिवधनुष्य खांद्यावर घेतले. सामाजिक, राजकीय परिवर्तन आणि बाळासाहेबांच्या विचाराने पछाडलेल्य...
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेश
Article

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेश

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेशजिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये व अंगणवाडी मध्ये प्रवेश कोण घेतात ?तर याचे उत्तर गोरगरिबांची मुले व ग्रामीण भागातील मुले जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये व अंगणवाडी मध्ये प्रवेश घेतात. हे वास्तव सत्य आहे.एवढेच कशाला जिल्हा परिषदांमध्ये शिकविणारे शिक्षक देखील आपल्या मुलांचा प्रवेश इंग्रजी माध्यमामध्ये केजी वन व केजी टू मध्ये करतात मात्र अंगणवाडीमध्ये करत नाहीत. किंवा सरकारी शाळांमध्ये करत नाही हे कटू सत्य आहे.मात्र नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना अंगणवाडी मध्ये दाखल करून लोकशिक्षण आणि समानतेला प्राधान्य दिला.यातून मिताली सेठी यांनी फार मोठा आदर्श व प्रेरणादायी संदेश दिला आहे.मिताली सेठी या तरुण आयएएस अधिकाऱ्यांपै...