📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरावती GMC जागेवर पुन्हा प्रश्नचिन्ह! 12 किमी दूर अलियाबादच्या जागेचा फेरविचार करण्याचे सरकारला निर्देश

On: July 5, 2026 12:16 PM
आम्हाला फॉलो करा:
अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अलियाबाद येथील प्रस्तावित जागेच्या फेरविचाराबाबत विधानसभेत आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केलेला मुद्दा

मुंबई | प्रतिनिधी

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) उभारण्यासाठी निवडण्यात आलेल्या अलियाबाद येथील जागेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभेच्या अधिवेशनात आमदार संजय खोडके यांनी हा मुद्दा उपस्थित करत शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील जागा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयासाठी व्यवहार्य नसल्याचे सांगितले.

त्यांनी सांगितले की, या ठिकाणी 500 ते 600 कोटी रुपये खर्च करून रुग्णालय उभारले तरी शहरापासून अंतर जास्त असल्याने अपेक्षित ओपीडी मिळणार नाही. त्यामुळे रुग्णालय सुरळीत चालविण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

आमदार खोडके यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडत सांगितले की, अलियाबादची जागा आता वनविभागाच्या अखत्यारीत (Identified Forest) आली असल्याने केंद्र सरकारची मंजुरी, कायदेशीर प्रक्रिया आणि तांत्रिक परवानग्यांमुळे प्रकल्पाला मोठा विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने या संपूर्ण प्रकरणाचा नव्याने विचार करून मुख्यमंत्री समितीसमोर वस्तुस्थिती मांडावी.

यावर सभागृहाचे पीठासीन सभापती राम शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला अलियाबादच्या जागेबाबत सर्व वस्तुस्थिती मुख्यमंत्री समितीपुढे मांडून फेरविचार करण्याचे निर्देश दिले. तसेच अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात पर्यायी जागा उपलब्ध असल्यास त्याचाही विचार करण्यास सांगितले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभागृहाच्या निर्देशांचे पालन करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

इर्विन रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा मुद्दाही गाजला

आमदार संजय खोडके यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या 500 खाटांच्या संलग्न रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा मुद्दाही उपस्थित केला. शासनाने आदेश दिल्यानंतरही इर्विन रुग्णालयाचे हस्तांतरण अद्याप पूर्ण झाले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या मते, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव अनेक महिन्यांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे मेडिकल विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत असून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now