📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

आधी बाथरूममध्ये खड्डा, मग पतीची हत्या! ४५ दिवसांनी उघड झाला पत्नीचा थरारक कट.!

On: July 4, 2026 5:33 PM
आम्हाला फॉलो करा:
आग्र्यात पत्नीने पतीची हत्या करून बाथरूममध्ये मृतदेह गाडल्याप्रकरणी पोलिसांचा तपास

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. एका महिलेने आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये गाडल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण कट इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने रचण्यात आला होता की तब्बल ४५ दिवस कोणालाही संशय आला नाही.

माहितीनुसार, ४४ वर्षीय सुरेंद्र शर्मा हे १८ मेपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतल्यानंतर बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. मात्र त्यांच्या पत्नीने प्रत्येकाला “ते बाहेर गेले आहेत, लवकरच परत येतील,” असे सांगून वेळ मारून नेली.

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू ठेवला. चौकशीदरम्यान पत्नीच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने तिच्यावर संशय गेला. त्यानंतर पोलिसांनी घराची सखोल झडती घेतली. बाथरूममध्ये नुकतीच फरशी बसवण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

फरशी आणि सिमेंट काढल्यानंतर खाली माती दिसली. त्यानंतर खोदकाम करण्यात आले असता सुरेंद्र शर्मा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राथमिक तपासात, हत्या करण्यापूर्वीच पत्नीने बाथरूममध्ये खड्डा तयार करून ठेवला होता. पतीची हत्या केल्यानंतर मृतदेह त्या खड्ड्यात पुरण्यात आला आणि त्यावर सिमेंट टाकून फरशी बसवण्यात आली. या कामासाठी आलेल्या मिस्त्री आणि कामगारांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सध्या आरोपी पत्नीला अटक करण्यात आली असून, या हत्येमागील नेमकं कारण काय, या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नियोजनबद्ध गुन्ह्याची ही घटना मोठी चर्चेचा विषय ठरली आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा