G-KPL17TQEZ3
अर्पण | Gaurav Prakashan
Skip to contentगझलेस मी केले जसे अर्पण मला…
जगण्यास सुंदर भेटले कारण मला…
तू गप्प बसण्याचे किती घेशील रे ?
ऐकायचे नाही तुझे भाषण मला…
दुनियेस या दोषी उगा मानू कसा ?
माझेच येथे भोवले ‘मी’पण मला…
फेटाळता आली न हळवी आर्जवे,
कळलेच नाही लाघवी शोषण मला…
आश्वासनांच्या तोरणावर भाळलो,
छळते अता सत्ते तुझे धोरण मला…
होतो कसा,झालो कसा,काळासवे?
हा प्रश्न छळणारा करे दर्पण मला…
मी वास्तवाच्या विस्तवाचा सोबती,
सांगू नको ते पुस्तकी श्रावण मला…
Post Views: 57
Like this:
Like Loading...