चुडाराम बल्हारपुरे नाटककार समाजगौरव पुरस्काराने सन्मानित
——————————————
झाडीपट्टीतील नाट्यसेवा व साहित्य सेवेबद्दल पुरस्कार.
———————————————
गौरव प्रकाशन गडचिरोली (प्रतिनिधी) : आदिम युथ फाऊंडेशन, नागपूर या संस्थेतर्फे गेल्या अठरा वर्षांपासून दरवर्षी समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजभूषण , समाजगौरव, समाजरत्न, समाजयोध्दा व रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे हे १९ वे वर्ष आहे.
अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता यावेळी राज्यभरातील १६ मान्यवर व एका संस्थेची निवड करण्यात आली.
यावेळी काल जैन भवन, गांधीबाग, नागपूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष आदिवासी संघर्ष समितीचे संयोजक मा. विश्वनाथजी आसई यांच्या हस्ते मा. चंद्रभानजी पराते (माजी आयुक्त, महाराष्ट्र शासन, नागपूर), प्रमुख अतिथी धनंजय धापोडकर, आदिमचे संपादक प्रकाशजी निमजे , सौ. अनिता पराते, किर्तीकुमार पराते, देवराम नंदनवार, रामाजी नंदनवार, ट्रस्टचे अध्यक्ष भाऊराव पारखेडकर, विनायक वाघ, ओमप्रकाश पाठराबे, इ. मान्यवरांच्या हस्ते या वर्षातील पुरस्कृत मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या झाडीपट्टीतील नाट्यसेवेबद्दल व साहित्य सेवेबद्दल तसेच सध्या शासन स्तरावरून सुरू असलेल्या त्यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” व “धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या नाट्यकृतींच्या यशाबद्दल *समाजगौरव पुरस्काराने* शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिद्ध कवी प्रकाश दुलेवाल व विनायक वाघ यांनी केले. चुडाराम बल्हारपुरे यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा – क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाला यावर्षी कंथेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील साहित्य संमेलनात साहित्य प्रेरणा पुरस्काराने तसेच एग्रोन्युज परिवार फलटण (जिल्हा सातारा) या ट्रस्टतर्फे धर्मवीर संभाजी महाराज साहित्य प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले असून “धरती आबा – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या नाटकाला साहित्यसेवा प्रज्ञामंच, पुणे चा पुरस्कारही जाहीर करण्यात आला आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा. यादव गव्हाणे, दादा चुधरी, डॉ . प्रा. श्याम मोहरकर, डॉ.प्रा. जनबंधू मेश्राम, डॉ.प्रा. योगीराज नगराळे, डॉ. प्रा. राजकुमार मुसणे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक) , आदिवासी साहित्यिक तसेच विविध संस्था, साहित्यिक, कवी, व पत्रकार मित्रांनी अभिनंदन केले आहे.