G-KPL17TQEZ3
निळ्या नभाखाली | Gaurav Prakashan
Skip to content तुम्ही सांगीतलं संघटीत व्हा
तुम्ही सांगीतलं संघर्ष करा
एकमेकावर कुरघोडी करू लागले,
कुवतीनुसार निळ्या नभाखाली
प्रत्येकजन आपलं घर बांधू लागला,
हल्ली त्याच नभाचा एक भाग होता यावं
मनात येईल तो वाटणी मागू लागला.
एक युवक त्याला श्याल्यूट करू लागतो
हृदयातून त्याचा सन्मान करू लागतो
आज नाना रंगासह तो गर्दित दिसतो
एखाद्या काडीवर, माडीवर, गाडीवर
तो युवक त्याची व्यथा जाणतो
अरे ! सोडवा त्याला त्यांच्या कचाट्यातून …
वाचवा जळत्या घराला त्या फुफाट्यातून…
पण त्याचा आवाज घोषणात विरून जातो.
मग तो बोलणा-या माईकचा वायरच कापून टाकतो,
हळूच त्याला खांद्यावर घेत माघारी फिरतो,
तशी सभेतील गर्दी त्याच्या मागे चालू लागते
आता तो पुढे चालत असतो, लेफ्ट राईट,
करीत गावागावातून निळ्या पाखरांसंवेत
‘कमांडो आगे बढ ‘ चा आदेश देत !
Post Views: 66
Like this:
Like Loading...