📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरावतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने भूसंपादनाला दिली वैधता

On: July 15, 2026 3:06 PM
आम्हाला फॉलो करा:
अमरावती इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर सुशोभीकरण प्रकल्पाला उच्च न्यायालयाची मंजुरी

गौरव प्रकाशन अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील इर्विन चौकात उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराच्या सुशोभीकरण आणि भव्य म्युरल प्रकल्पाला अखेर मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकल्पासाठी करण्यात आलेले भूसंपादन पूर्णपणे कायदेशीर आणि वैध असल्याचे स्पष्ट करत याचिका फेटाळून लावली आहे.

या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या प्रकल्पाला आता वेग मिळण्याची शक्यता आहे. शहरातील नागरिकांसह आंबेडकर अनुयायांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.

न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि राज डी. वाकोडे यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि लोकशाही मूल्ये पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्युरल उभारणे हा व्यापक सार्वजनिक उद्देश आहे. त्यामुळे हा प्रकल्प भूसंपादन कायदा 2013 अंतर्गत वैध ठरतो.

न्यायालयाने संविधानातील कलम 51(ए) चा उल्लेख करत देशाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणे हे शासन आणि नागरिकांचे कर्तव्य असल्याचेही नमूद केले.

या प्रकरणात पुतळ्यालगतची सुमारे 6,600 चौरस फूट जागा संपादित करण्यात आली आहे. ही जागा थेट स्मारकाला लागून असल्याने कोणाचेही विस्थापन होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच प्रशासनाने संबंधित जागेचा 99.22 लाख रुपयांचा मोबदला आधीच जमा केल्याची नोंदही न्यायालयाने घेतली.

दरम्यान, याचिकाकर्त्याला पुढील कायदेशीर पर्याय वापरण्यासाठी चार आठवड्यांची ‘जैसे थे’ मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपल्यानंतर प्रशासन सुशोभीकरण आणि भव्य म्युरल उभारणीच्या कामाला गती देणार आहे.

या निर्णयामुळे अमरावतीतील ऐतिहासिक इर्विन चौक परिसराचे नवे रूप नागरिकांना लवकरच पाहायला मिळणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा अधिक प्रभावीपणे जतन केला जाणार आहे.

‘खाशाबा’चा नायक कोण? नागराज मंजुळेंचा नवा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!