- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : मराठी भाषेतील आद्यग्रंथ असलेल्या लीळाचरित्राची रचना ज्या भूमीत झाली त्या रिद्धपूरपासून ते राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेडराजापर्यंत विस्तार असलेला व-हाडभूमीचे महाराष्ट्रीय संस्कृतीचे अनन्यसाधारण स्थान आहे. गोदावरी आणि तापी नदीच्या उपनद्या या प्रदेशातून वाहतात. कापूस, सोयाबीन, तूर अशा पीकांबरोबरच संत्रा, सीताफळासारख्या फळपीकांचे हबही या भूमीत विकसित झाले आहेत.
या विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांची वैशिष्ट्ये, आवश्यकता लक्षात घेऊन राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने अर्थसंकल्पाद्वारे अनेक योजना व उपक्रमांना चालना देऊन सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली आहे.
मराठी भाषेचे गौरवस्थळ मानल्या जाणा-या रिद्धपूर (जि. अमरावती) येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय अर्थसंकल्पाद्वारे झाला आहे. अमरावती येथील शासकीय ज्ञान विज्ञान संस्था, तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाचवेळी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ आणि दोन मोठ्या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणे ही घटना अमरावतीच्या शिक्षणपरंपरेला दृढ करणारी आहे.
विदर्भाचा कॅलिफोर्निया मानल्या जाणा-या मोर्शी जिल्ह्यात, तसेच बुलडाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत. या परिसरातील संत्रा उत्पादन मोठे आहे. प्रक्रिया केंद्रे निर्माण झाल्याने येथील फळ उत्पादक शेतक-यांना त्याचा लाभ होईल. विदर्भ, मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतक-यांना अन्नधान्याऐवजी प्रतिवर्ष 1800 रूपये रोख देण्यात येणार आहे. हा निर्णय गरीब शेतकरी बांधवांना दिलासा देणारा आहे.
वैनगंगा-नळगंगा- पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर विभागातील नागपूर व वर्धा जिल्ह्यासह व-हाडातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांना पाणी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. व-हाडातील मोठा भूभागाला या प्रकल्पाद्वारे पाणी मिळून त्या परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होणार आहे.
पायाभूत सुविधांमध्ये अमरावती विभागाला भरभरून मिळाले आहे. अकोला व अमरावती येथील विमानतळाचा विस्तार करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. उद्योगवाढीसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्तार योजनेत सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी महामार्ग बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हे दत्तस्थान या मार्गावर येणार आहे. या निर्णयांमुळे परिसरात विकासाला चालना मिळेल.
अमरावती व बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, ती आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–