संत्रा प्रक्रिया प्रकल्प व वायनरी प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करा- आदीतीताई तटकरे
वरुड : वरुड मोर्शी तालुक्यामध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्प तयार करण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून वरुड मोर्शी तालुक्यामध्ये नागपुरी संत्रावर प्रक्रिया व संत्रा ज्युस, संत्रा पल्प निर्मिती प्रकल्पास मंजूरी देणेबाबत फलोत्पादन मंत्री आदीतीताई तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले .
विदर्भातील मुख्य फळपिक असलेले संत्र त्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. त्यावर अवलंबून असणाऱ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी एकीकृत संत्रा उत्पादन वाढ, तंत्रज्ञान प्रक्रीया व पणन असा प्रकल्प या भागात व्हावा, अशी संकल्पना आमदार देवेंद्र भुयार यांनी बैठकीमध्ये मांडली.
राज्यात फलोत्पादनाखालील क्षेत्राचा विचार केला तर संत्रा लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. विदर्भात १ लाख ४० हजार हेक्टरक्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे. यापैकी ४५ हजार हेक्टर क्षेत्र वरुड मोर्शी तालुक्यातील आहे . मात्र संत्र्यावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग विदर्भात नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला संत्रा व्यापाऱ्यांना देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावावर समाधान मानावे लागते. यातून संत्रा उत्पादकांची आर्थिक गळचेपी होत आहे. संत्रा उत्पादकांना न्याय देण्यासाठी सर्वप्रथम विदर्भात संत्रा प्रक्रिया उभारन्यासाठी मोर्शी विधनासभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला आहे. वादळ, गारपीट यामुळे खाली पडलेला व व्यापाऱ्यांनी चुरा म्हणून बाजुला फेकलेला संत्राही प्रक्रिये करिता उपयोगी आणता येतो. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे संत्रा उत्पादकांचे नुकसानही टळू शकते त्याकरिता मोर्शी वरुड तालुक्यामध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्प तयार करण्यासाठी व संत्र्यापासूनही दर्जेदार वाईन तयार करण्यासाठी संत्रावर वायणरी तयार करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी फलोत्पादन मंत्री आदीतीताई तटकरे यांच्याकडे मागणी केली आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ वरुड मोर्शी तालुक्यामध्ये नागपुरी संत्रावर प्रक्रिया प्रकल्पाकरिता तातकल प्रस्ताव सादर करण्याचे व झटामझिरी येथील जागेची पाहणी करण्याचे निर्देश फलोत्पादन मंत्री आदीतीताई तटकरे यांनी बैठकीमध्ये दिले.
या बैठकीला फलोत्पादन मंत्री आदीतीताई तटकरे, मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, कृषी आयुक्तालयाचे संचालक (फलोत्पादन) डॉ. के.पी. मोते, संचालक श्री.एन.टी. शिसोदे, कृषी व पदुम विभागाचे सह सचिव (फलोत्पादन) श्री.अशोक आत्राम, उद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी श्री. अनिलकुमार उगले, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग श्री.सुभाष नागरे, पणन विभागाचे कक्ष अधिकारी श्री.जयंत भोईर, बाळू कोहळे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, माजी पं स सभापती निलेश मगर्दे, रमेश जिचकार, निलेश रोडे, संजय डफरे, यांच्यासह नियोजित प्रकल्पाशी संबंधित शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते.