- * मोर्शी तालुक्यात मृग बहार संत्रावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव !
- * मृग बहाराच्या संत्रावर पडले काळे डाग !
मोर्शी : मोर्शी तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक मदार मृग बहरावर असतांना संत्रा फळावर अज्ञात रोग आल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. फळांची झाडे पिवळी पडत आहे व काही झाडे सुकत आहेत. झाडावरील मृग बहाराची संत्रा फळे काळे पडत आहे. त्यामुळे या रोगावर योग्य उपाय योजना कशी करावी यासाठी फळ उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असतांना मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता उप विभागीय कृषी अधिकारी डॉ. राहुल सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, तालुका कृषी अधिकारी माधुरी निंबाळकर यांनी घोडगव्हान येथील निखिल टेकाडे, पुरुषोत्तम टेकाडे, यांच्या शेतातील संत्रा बागेला भेट देऊन संत्रा बागेची पाहणी केली.
मोर्शी तालुक्यांत संत्रा लागवडीखालील क्षेत्र मोठे आहे. सद्यःस्थितीत संत्रा उत्पादकांद्वारे आंबिया व मृग बहराचे नियोजन केले जात आहे. मात्र अज्ञात रोगामुळे मृग बहाराच्या संत्रावर काळे डाग पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वादात असून पाने पिवळी पडण्याच्या समस्येला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोर्शी तालुक्यातील घोडगव्हान या भागात या समस्येने थैमान घातले आहे. विविध प्रकारच्या उपाययोजना करून देखील ही समस्या नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी जेरीस आले होते. अनेक शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली. त्यावर त्यांचा मोठा खर्चही झाला. परंतु मृग बहाराचे संत्रा फळ काळे पडत असून पाने पिवळी पडण्याच्या समस्येमुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.
संत्रा आंबिया व मृग बहाराचे क्षेत्र तालुक्यांत मोठ्या प्रमाणात आहे. आंबिया व मृग बहारात अज्ञात रोगाचे आक्रमण, फळगळती, पावसाचा खंड, वाढलेल्या तापमानामुळे आंबिया बहारात फळगळ, मृग बहारात बहार न फुटणे व फुटलेल्या बहाराची संत्रा फळांवर काळे डाग पडत आहे. फळगळीमुळे व मृग बहार कमी प्रमाणात फुटल्यामुळे संत्रा उत्पादनात घट झाली आहे. फळगळतीमुळे झालेल्या नुकसानाची वस्तुस्थिती जाणून घेणे, त्याची कारणे शोधून उपाययोजना करण्यासाठी आंबिया व मृग बहार फळगळतीसंदर्भात मोर्शी तालुक्यांतील बागांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उप विभागीय अधिकाऱ्यांनी डॉ राहुल सातपुते, तालुका कृषी अधिकारी माधुरी निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचली तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, कृषी पर्यवेक्षक मोहन फुले, अरुण चरपे, कृषी सहाय्यक सौ निस्ताने, संत्रा उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम टेकाडे, संजय टेकाडे, नरेंद्र टेकाडे यांनी संत्रा बागेची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मोर्शी तालुक्यात मृग बहाराच्या संत्रावर अज्ञात रोगामुळे काळे डाग पडत आहे. याचे चार वेगवेगळी कारणे असून शकता. नेमक्या कोणत्या कारनामुळे संत्रावर डाग पडत आहे याचे निदान करण्यासाठी कृषी विद्यापीठ व लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र यांच्या शास्त्रज्ञांना पत्र लिहून पाहणी करण्यासाठी विनंती केली आहे. ते लवकरच तालुक्यातील बागांची पाहणी करून मार्गदर्शन करणार आहे. तोपर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या आहे.
- – डॉ. राहुल सातपुते
- उप विभागीय कृषी अधिकारी, मोर्शी.
—–