अमरावती: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
Contents
hide
जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे समितीचे अध्यक्ष असून, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार हे सदस्य सचिव आहेत. उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, सायबर सेलचे पोलीस अधिकारी प्रवीण काळे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, संवादतज्ज्ञ प्रा. डॉ. कुमार बोबडे, सहायक जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी मनीष फुलझेले, आकाशवाणीचे मुख्य कार्यक्रम अधिकारी एकनाथ नाडगे आदी सदस्य आहेत.