- * अन्नत्याग आंदोलनामध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार !
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी दापोरी येथे आज एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दर वर्षी १९ मार्च रोजी संवेदनशील नागरिक एक दिवस अन्नत्याग करतात. या वर्षीही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या वर्षी नागरिकांनी अन्नत्याग करून आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केले आहे.
बळीराजाची आत्महत्या हा महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजमनाला लागलेला एक जिव्हारी चटका आहे. १९ मार्च १९८६ रोजी पहिल्यांदा एक फास आवळला गेला. या दिवशी सुरु झालेल्या दुष्टचक्रातून अजुनही बळीराजा सुटलेला नाही. चिलगव्हाणच्या त्या पहिल्या आत्महत्येच्या कटू आठवणीनिमित्त आज दापोरी येथील शेतकरी अन्नत्याग आंदोलन करणार आहे.
अस्वस्थ असलेल्या साहेबरावांनी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन पवनार आश्रमात जेवणात विषारी औषध कालवून आत्महत्त्या केली. मृत्यपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात ‘शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे’ असे नमूद केलं. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत सांगणारे होते. साहेबराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला. या दुर्दैवी घटनेला ३७ वर्ष पूर्ण झालीत.
आताही बळीराजा नापिकी, कर्ज आणि सरकारी अनास्थेचा बळी ठरतोय. या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याविरूध्द सहवेदना व्यक्त करण्यासाठी राज्यभर शेतकऱ्यांवर प्रेम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आज अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राजकीय क्षेत्रातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. आज दापोरी येथे अन्नत्याग आनोदलनासाठी दापोरी येथील शेकडो शेतकरी मंडळी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–