
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील प्रसिद्ध कवी, लेखक, मुखपृष्ठ परीक्षक तथा साहित्यिक प्रशांत वाघ यांचे सुपुत्र प्रणित प्रशांत वाघ यांचा मंगल परिणय सोहळा रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वा. ४० मिनिटांनी वैजापूर (जि. छ. संभाजीनगर) येथील द्रौपदी लॉन्स, मापारी वस्ती, नागपूर रोड येथे संपन्न होणार आहे. वधू पूजा प्रकाश शिनगारे ह्या अव्वलगाव (ता. वैजापूर, जि. छ. संभाजीनगर) येथील प्रकाश कडूबा शिनगारे यांच्या कन्या आहेत.
या सोहळ्यास संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यिक प्रेमी, कलाकार, उद्योजक आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रमुख अतिथी तथा ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, अहिल्यानगर यांनी दिली आहे.
साहित्यिक प्रशांत वाघ यांचा साहित्यसेवेचा गौरवशाली वारसा
गेल्या चार दशकांपासून कवी प्रशांत वाघ यांनी साहित्य, काव्यलेखन आणि समीक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान या संस्थेमार्फत मागील चार वर्षांपासून राज्यातील विविध साहित्यिकांच्या कलाकृतींना पुरस्कार देऊन गौरविण्याचे कार्य सुरू आहे.
संस्थेचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत अध्यक्ष मा. संजय वाघ, उपाध्यक्ष यमुना अशोक नारळकर, सचिव राजेश शहादू वाघ, खजिनदार अशोक नारळकर, मार्गदर्शक आई अंजनाबाई शहादू वाघ, तसेच सदस्य प्रशांत वाघ, जालिंदर नारळकर, नीता प्रशांत वाघ, जयश्री संजय वाघ, उषा राजेश वाघ, प्रणित प्रशांत वाघ, मनीषा जालिंदर नारळकर हे प्रतिष्ठानचे कार्य समर्थपणे पाहतात.
उपस्थित मान्यवर व स्नेहीगट
या मंगल सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांमध्ये उद्योजक मा. प्रविण मोरे (लातूर), विजयजी गिरासे (पुणे), सुश्रुत जोशी (पुणे), प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार (कोपरगाव), गझलकार राम गायकवाड (कोपरगाव), पिंपळगाव जलालचे सरपंच प्रविण देशमुख, सामाजिक कार्यकर्ते मा. विष्णू दगडू थोरात (शिर्डी), उपसरपंच सविताताई धिवर, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगारांची पतपेढीचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे (कोपरगाव), तंटामुक्ती अध्यक्ष मा. विनायक भोरकडे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चंद्रशेखर खर्चे (नागपूर), रिताताई जाधव (मुंबई), पोलीस अधिकारी मंगल कसबे (शिर्डी) यांच्यासह राज्यभरातील साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.

व्यवस्थापन व संयोजन
व्यवस्थापकीय जबाबदारी मा. दादाजी आहिरे, युवराज बच्छाव, बाळासाहेब बच्छाव, राजू पटाईत, वैभव आहिरे, सुशील आहिरे, रवी बच्छाव, दीपक आहेर, अशोक आहिरे, अश्विनकुमार धिवरे, धरम कानकुब्जी, दीपक कानकुब्जी, पोपट वाघ, अनिल वाघ, सुनील पगारे, संतोष धिवर, संतोष मोरे, पुनमचंद गुंजाळ, रंगनाथ पा. भोरकडे, भागवत पा. भोरकडे आदींकडे सोपविण्यात आली आहे.
कार्यवाहक म्हणून हरिष बनसोडे, सचिन आहिरे, ज्ञानेश्वर पगारे, आशिष खर्चे, प्रविण बनकर, दत्तात्रय भालेराव, निशांत आहिरे, रावसाहेब आहिरे, सुभाष आहेर हे कार्यरत राहणार आहेत. निमंत्रण कार्यात मा. गोपाळ बच्छाव, सम्राट जमधडे, निलेश पवार, किरण गरुड, संतोष शिरसाठ, बाळासाहेब खंडागळे, सचिन केदारे, सुधीर नारळकर, राम आहिरे, मयूर भालेराव, समाधान आढांगळे आदींचा सहभाग आहे.
संयोजक पद भूषविणारे मा. विनायक बनकर, मा. सुरेश बनसोडे, मा. वसंत वाघ, मा. शरद आहिरे, अशोक नारळकर, जनार्दन आहिरे, मगन आहिरे, सुखदेव पगारे, विजय वाघमारे, बंडूकुमार धवणे, प्रकाश म्हसदे, रमेश सोनवणे, शांताराम बच्छाव, कुणाल बागुल, समाधान आदी आहेत.
स्वागत समारंभासाठी स्वागतोत्सुक परिवार
प्रणील प्रशांत वाघ, प्रणिता प्रशांत वाघ, तेजस संजय वाघ, भाग्यश्री हरिष बनसोडे, सपना संजय वाघ, यश राजेश वाघ, आदित्य राजेश वाघ, पूजा जालिंदर नारळकर, सुजाता आशिष खर्चे, सुधीर अशोक नारळकर, प्रविण अशोक नारळकर, अभिजित जालिंदर नारळकर, विशाल वाघ, अनिकेत वाघ, युवराज वाघ, सुमित आहेर, अभिषेक खंडागळे, कार्तिक समाधान, भाग्यश्री आहेर, अंजली खंडागळे, भूमी वाघ, सपना वाघ, सृष्टी वाघ, भक्ती वाघ, सुजाता खर्चे हे स्वागतासाठी तैनात असतील.
वाघ परिवाराचा एकत्रित आनंदोत्सव
नानूबाई महादू वाघ, अंजनाबाई शहादू वाघ, रंजना भागीरथ वाघ, भागीरथ महादू वाघ, निर्मला प्रकाश वाघ, प्रकाश महादू वाघ, प्रज्ञा समीर वाघ, समीर भागीरथ वाघ, अलका मोहन वाघ, मोहन निवृत्ती वाघ, सविता रविंद्र वाघ, रविंद्र तुकाराम वाघ, लता त्र्यंबक वाघ, त्र्यंबक सुखदेव वाघ, सुरेखा जयप्रकाश वाघ, जयप्रकाश गंगाधर वाघ, जयश्री नामदेव वाघ, नामदेव मुरलीधर वाघ, वंदना अशोक वाघ, अशोक दामोधर वाघ, आशा प्रभाकर वाघ, प्रभाकर कारभारी वाघ, सुभद्राबाई सीताराम वाघ, सीताराम चांगदेव वाघ, गयाबाई भाऊसाहेब वाघ, रेखा दीपक वाघ, शीलाबाई सुरेश वाघ, सुरेश जगन्नाथ वाघ, कमल राजेंद्र वाघ, राजेंद्र कचरू वाघ, छाया राजेंद्र वाघ, राजेंद्र भास्कर वाघ, संगीता नंदू वाघ, नंदू एकनाथ वाघ यांनी सर्वांना या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
गौरव प्रकाशनकडून मंगलमय शुभेच्छा.!
गौरव प्रकाशन, अमरावती या संस्थेने समाजहिताच्या असंख्य उपक्रमांमध्ये कार्य केले आहे. या अनोख्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक संगमाच्या निमित्ताने गौरव प्रकाशन परिवाराकडून प्रणित वाघ व पूजा शिनगारे यांच्या विवाहाला मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा! हा सोहळा वाघ परिवाराच्या एकात्मतेचा आणि साहित्यविश्वाच्या प्रेमबंधाचा सुंदर उत्सव ठरणार आहे.
गौरव प्रकाशन प्रतिनिधी, अहिल्यानगर
दिनांक : १६ नोव्हेंबर २०२५
स्थळ : द्रौपदी लॉन्स, मापारी वस्ती, वैजापूर, जि. छ. संभाजीनगर