📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

आधार आता डिजिटल! एका फोनमध्ये ठेवा सर्वांचे कार्ड

On: November 12, 2025 11:45 AM
आम्हाला फॉलो करा:
“UIDAI चा नवीन Aadhaar App – एका मोबाईलमध्ये कुटुंबातील ५ आधार कार्ड ठेवण्याची सुविधा”
“UIDAI चा नवीन Aadhaar App – एका मोबाईलमध्ये कुटुंबातील ५ आधार कार्ड ठेवण्याची सुविधा”

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी नवे Aadhaar App लाँच केले आहे. या अ‍ॅपमुळे आता आधार कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही. एकाच मोबाईलमध्ये कुटुंबातील पाच सदस्यांचे आधार कार्ड ठेवता येतात. मात्र यासाठी सर्व सदस्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक एकच असणे आवश्यक आहे.

या अ‍ॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक लॉक आणि QR कोड शेअरिंग यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा सुविधा आहेत. त्यामुळे आधार डेटा अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपा झाला आहे. QR कोड स्कॅन करून बँक, कार्यालये किंवा अन्य ठिकाणी तत्काळ पडताळणी करता येते.

UIDAI च्या या अ‍ॅपमुळे इंटरनेट नसतानाही सेव्ह केलेले आधार पाहता येतात. तसेच ‘ॲक्टिव्हिटी लॉग’मुळे आपला आधार कधी, कुठे वापरला गेला याची संपूर्ण माहिती मिळते.

अ‍ॅप डाउनलोड करण्याची पद्धत:
1️⃣ Google Play Store किंवा Apple App Store वर ‘Aadhaar App’ शोधून डाउनलोड करा.
2️⃣ भाषा निवडा आणि १२ अंकी आधार क्रमांक टाका.
3️⃣ नोंदणीकृत मोबाइलवर आलेला OTP टाकून पडताळणी करा.
4️⃣ फेस ऑथेंटिकेशन करून सुरक्षा पिन सेट करा.

UIDAI चे हे अ‍ॅप पूर्णपणे विनामूल्य असून, देशातील १४० कोटींपेक्षा अधिक नागरिकांसाठी डिजिटल आधार व्यवस्थापनाचा हा सर्वात सुरक्षित आणि सोयीचा मार्ग ठरणार आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!