टिटवीचे ओरडणे अभद्र नव्हे !
Contents hideटिटवीबद्दलची पोस्ट टाकल्यावर त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया एक अंधश्रद्धा आहे हे पण अनेकांना पटले पण पर्यावरणामध्ये प्रत्येक प्राणी कीटक याचे जैव-वैविधतेच्या दृष्टीने स्थान महत्त्वाचे आहे.
त्यामुळेच इथला नियम आहे जगा आणि जगू द्या.
टिटव्या फक्त रात्रीच ओरडत नाहीत. त्या दिवसाही ओरडतात! फरक फक्त एवढाच की, दिवसभर सुरू असलेल्या कोलाहलामुळे टिटव्यांचे ओरडणे आपल्या कानी पडत नाही. तरीही टिटव्या प्रामुख्याने रात्रीच्याच कालवा करतात आणि यामागे मोठे कारण आहे. अगदी मध्यरात्रीही टिटव्या टीव… टीव… टीटीव… टीव…! असा टाहो फोडतात. टिटव्यांचे ओरडणे मात्र कोणत्याच अंगाने अशुभ नसते. ती केवळ एक अंधश्रद्धा आहे.खेड्यात जुने घर अगदी शेताला लागून होते. आमचा वाडा संपला की खारी सुरू व्हायची.शिवाय अनेकदा रात्री शेतावर राहिलो असल्याने मी टिटव्यांचे ओरडणे अगदी जवळून अनुभवले आहे. हा पक्षी निशाचर नसला तरी गडद काळोखातही अगदी स्पष्टपणे पाहू शकण्याची दृष्टी त्याला निसर्गाने प्रदान केलेली आहे. टिटव्या जमिनीवरच वावरतात. हा पक्षी उंच आकाशात विहार करीत नाही. परंतु, तरीही टिटवी बरेच अंतर उडू शकते. मोकळी मैदाने किंवा उघड्या माळरानावर टिटव्या राहतात. टिटव्या उघड्यावरच अंडी देतात. हा पक्षी प्रामुख्याने जोडप्याने राहतो. कोल्हे, खोकड, मांजरी, साप, मंगूस, घोरपडी आदी प्राणी टिटवीचे पारंपरिक शत्रू आहेत. रात्री जेव्हा एखादा प्राणी त्यांच्या अधिवास क्षेत्रात दाखल होतो तेव्हा टिटव्यांची अंडी किंवा पिल्लं धोक्यात असतात. प्रसंगी काही प्राणी टिटव्यांची शिकारही करतात. मात्र, शत्रू आपल्या परिसरात दाखल झाल्याचा सुगावा लागताच टिटव्या त्या प्राण्यावर एकाएकी हल्ला चढवतात. जोरजोराने ओरडून शत्रूवर झडप घालतात. आणि त्याला पिटाळून लावतात. जोपर्यंत शत्रू त्यांचा अधिवास असलेल्या परिसरातून दूर जात नाही, तोपर्यंत टिटव्यांचा गलका सुरूच असतो. काही वेळाने टिटव्यांचा कालवा थांबतो. परंतु, भूकेने व्याकूळ झालेला शत्रू प्राणी पुन्हा परत येतो आणि दहा-पंधरा मिनिटांतच पुन्हा टिटव्यांचा कोलाहल सुरू होतो. रात्री पायवाटेने मळ्यात ऊसाला पाणी देण्यासाठी जात असताना अनेकदा टिटव्यांनी आम्हा भावंडांचा माझा पाठलाग केलेला आहे.
रात्रीच्या वेळी साप तिची अंडी खायला आला तर ती कर्कश्य ओरडून त्याला परत जायला भाग पाडते. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांनाही सापाची चाहूल लागते. यात आईची ममता आहे. अशुभ असे काहीच नाही. म्हणून टिटवीचे ओरडणे अपशकुनी नसते. निसर्गाचे संवर्धन करणे ही आज काळाची गरज आहे.
Related Stories
November 3, 2024
November 3, 2024