मराठे युद्धात जिंकले पण तहात हरले म्हणनाऱ्यांनो तुमची थोबाड बंद करा…!
न भूतो न भविष्यती असा मोर्चा तर निघाला होताच. त्याच बरोबर न मॅनेज होणारा मनोज जरांगे पाटील यांनी प्रामाणिक पणा असेल तर फकीर ही राजाला हरवू शकतो हे जगाला दाखवून दिलं खर तर इथंच सर्वात मोठा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे. हे ह्या वाचाळ वीरांना दिसणार नाही.उगाच अकलेचे तारे तोडून तुम्ही किती बेअक्कल आहात हे सिद्ध करू नका….!
दुसर म्हणजे कुठल्याही आंदोलनात आज वर सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्या नाहीत. परंतु जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या अस जर राज्याचा मुख्यमंत्री लाखो जनतेसमोर सांगत असेल , आणि मसुद्यात काही दगाफटका असेल तर कुणी गद्दारी केली म्हणायची ? ते तुम्ही ठरवा.
जो समाज नेतृत्वाच्या शोधत होता त्या समाजाला सेनापती भेटला तो ही एकदम प्रामाणिक ज्याचा लढा हा केवळ सात महिन्याचा नव्हता तर 2014 पासून चालू होता. म्हणून तर मराठवाडा पूर्ण पाठी उभा होता.
सर्वात महत्वाचं म्हणजे आज वर जे शक्य नव्हतं , राज्यातीलच नव्हे तर देशातील मराठा ,अगदी बाहेर देशात असणारा मराठा देखील ह्या आंदोलनामूळे एक झाला. मराठ्यांची खरी ताकत जगा समोर आली. आणि तुम्ही म्हणत असाल तहात मराठे हरले तर तुमची थोबाड बंद करा. लढाई अजून संपलेली नाही आणि लढा ही संपला नाही मग मराठे तहात हरले कसे?
दुसर म्हणजे इतिहासात जे घडलं ते वारंवार घडत नसत तर वर्तमानात जे चांगलं घडत असते त्याचा ही चांगला इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहला जातो तो कालच्या आंदोलनाचा लिहला जाईल… बाकी इतर पुन्हा सुरू झाले त्याना एकच सांगतो
हाथी चले अपनी चाल
कुत्ते भोककर बेहाल…..
त्यांना काय भो भो करायची ते करू द्या आपण 2024 ची तयारी करू नाय का…