सर्वव्यापक बाबासाहेब समजून घेण्याची गरज – प्रा.डॉ.नरेश इंगळे
गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : बहुजन समाजासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले अद्वितीय कार्य हे सर्वश्रुत आहेतच शिवाय भारताच्या जडणघडणीतही तितकेच महत्त्वपूर्ण असे योगदान आहे म्हणून त्यांना विशिष्ट जाती-धर्माच्या चौकटीत न बसविता त्यांच्या सर्वव्यापक नेतृत्वाचे पैलू सर्व भारतीयांनी समजून घेण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन प्रा. डॉ. नरेश इंगळे यांनी केले आहे.
चिंचपूर येथील बौद्ध विहार परिसरात आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चंद्रशेखर कडू प्रा. विजय कामडी, प्रा. प्रशांत टांगले, पोलीस पाटील दादाराव महात्मे माणिकराव शेंडे,माजी उपसरपंच शिशिर शेंडे,देविदास धारणे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम गावकरी व मान्यवराचे उपस्थितीत डॉ. नरेश इंगळे यांच्या शुभ हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मान्यवराच्या हस्ते प्रतिमा पूजन, त्रिशरण पंचशील, आणि मान्यवर व विद्यार्थी यांची भाषणे झालीत.
यावेळी प्रा. विजय कामडी, प्रा. प्रशांत टांगले यांच्यासह सुरेश शेंडे, मोनिका शेंडे,साहिल काळबांडे उन्नती काळबांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रणय शेंडे यांनी केले कार्यक्रमाला गावकरी तसेच बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.