करजगाव येथे भिमजयंती उत्साहात संपन्न
करजगाव : करजगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात संपन्न झाली. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीची सुरुवात झाली. यावेळी वाहनावर बाबासाहेबांची भव्य प्रतिमा लावण्यात आली होती. डीजे वरील भीमगीतांच्या तालावर तरुण-तरुणी बेभान होऊन नाचत होते. जय भीम च्या गजराने सारेगाव दुमदुमून गेले होते. मुख्य रस्त्यावर फिरून झेंड्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्धाचार्य शंकरराव धवणे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच रघुनाथजी जाधव, श्रीमती मैनाबाई बरडे, श्रीमती कमलाबाई वानखडे, केशवराव धवणे, रमेश वरघट, नितेश पवार हे मंचावर उपस्थित होते. यावेळी अंकिता जाधवने भीमपाळणा सादर केला. तर दीक्षांत बरडे, दीक्षा मनवर, उत्तमराव बरडे ,गंगा बरडे,आणि जमुना बरडे यांनी भीम गीते सादर केलीत. यानंतर आम्रपाली धवणे ,संदीप धवणे ,नितेश पवार , प्रा.रमेश वरघट,नितेश चव्हाण यांची बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झालीत.
जयंतीचे औचित्य साधून राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश वरघट आणि अर्जुन वरघट या बंधुनी गावाचा लौकिक वाढविणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला. नीलिमा वरघट यांची मंत्रालयात सहाय्यक संचालक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल, अमरदीप धवणे यांची एम. पी .एस. सी .मार्फत मंत्रालयात कक्षाधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल, रोशन श्रीराम चव्हाण याची एम.बी.बी.एस. करिता निवड झाल्याबद्दल, तन्वी अनिल राठोड ची तायकांडो स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल, आणि अविनाश गजानन राठोड याची पोस्टमन पदावर नियुक्ती झाल्याबद्दल या सर्वांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी जाधवने तर दीक्षा मनवरने आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास वानखडे, दशरथ बरडे,संजय बरडे,जगन्नाथ वानखडे, अरुण धवणे, रामहरी धवणे देविदास मनवर, राहुल बरडे,धम्मपाल बरडे, सागर बरडे, अवधूतराव बरडे, देविदास बरडे, निलेश बरडे,उमेश बरडे, जगतपाल बरडे, राजपाल बरडे, किसनराव बरडे,गौरव बरडे, किरन धवणे धनराज धवणे, सुमेध धवणे, निखिल वानखडे, कपिल वानखडे, सिद्धार्थ धवणे, अनुराग धवणे, आशाबाई वरघट, छाया वानखडे, सीमा जाधव, कांता बरडे संगीता बरडे,वनिता वानखडे, प्रतिभा वानखडे, पद्मा धवणे, राधा धवणे, रजूबाई धवणे, राजनंदनी धवणे तन्वी वानखडे, विशाखा वानखडे, शारदा धवणे, कोकिळा मनवर, शोभा धवणे, रंजना बरडे, कल्पना बरडे, विमलाबाई बरडे, मंदा धवणे, आरती धवणे, विशाखा बरडे, पूजा बरडे, आणि भूमिका वानखडे यांनी परिश्रम घेतले.