Wednesday, January 14

Tag: story

दिवाई…
Story

दिवाई…

दिवाई...दोन दिवसावर दिवाई येऊन ठेपली होती.बजारहाटेत लोकाची सामानसुमान खरेदीसाठी करण्यासाठी निरानाम गर्दी ही गर्दी दिसायची.सणासुदीच्या दिवसात कित्येकांच्या घरादाराची सुरू असलेली साफसफाई व रंगरंगोटी संपत आली होती. कपडेलत्ते,फळे,फटाखे,फरायाची दूकाने मस्त सजली होती. प्रत्येकाच्या चेहरयावर सणासुदीचा आनंद झळकत होता.लहानापासून तर मोठया पर्यत सारीच दिवाईच्या सणानं कामाले लागली होती.यशोदीलेही अजून चारपाच घरची धुणीभांडी करायची होती.मोठया लगबगीने ती कामासाठी पायटीच निघाली होती.सपासप पावल टाकत अंतर कापत होती.डोकं मात्र विचारान सुन्न झालं होतं. झाकटीतच उठल्या पासून नीरा नुसती धावाधावच तीच्या पाचवीला पुजली होती.कामानं तीचं सार आंग आंबून गेल होत.कामान आलेला थकवा तीच्या हाडकुळया ,निस्तेज चेहऱ्यावर व क्षीण झालेल्या देहावर क्षणोक्षणी जाणवत होता.कुपोषणाने शरीर गलीतगात्र झालेलं, नेहमी एकच मळकट साडी, मध्...
यशोगाथा तिच्या संघर्षाची
Story

यशोगाथा तिच्या संघर्षाची

यशोगाथा तिच्या संघर्षाचीपाचवीला असल्यापासून ती कष्टाशी भिडत राहिलेली.तिच्या आजी आजोबांसोबत भाजीपाला विकता विकता एम. कॉम. पर्यंत शिक्षण तिने घेतलं.आयुष्याच्या त्याच वळणावर तिचं लग्न माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत झालं.त्यावेळी मी वॉचमन होतो.आमचं लग्न झालं खरं परंतु एकमेकांच्या संघर्षाला सोबत घेऊनच आम्ही बोहल्यावर उभे राहिलो. आमच्या दोघांच्या मध्ये असणारा अंतरपाट आजही आठवतो मला.त्या पांढऱ्या वस्त्रावर त्याक्षणाला कदाचित आमच्या दोघांच्या आयुष्याचं ध्येय एकत्र येऊन नटलेलं असावं.लग्नानंतर तिचं शिक्षण पाहता मी तिला अगदी दुसऱ्या दिवशी म्हणालो सुध्दा, “ दिपाली एम. कॉम.झालेलं आहे. घरात बसून चालणार नाही.पुढं ही शिक आणि नोकरी ही कर.मी सोबत राहीन.” त्यावेळी तिने मला उत्तर दिलेलं. ती म्हणाली होती, “ आयुष्यात नोकरी करायला मला कधीच जमणार नाही.घर, संसार या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मला ते शक्य ही ह...
ताशा, वेश्या आणि कविता
Story

ताशा, वेश्या आणि कविता

ताशा, वेश्या आणि कविता(सत्य कथा.)शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं.मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता.रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती.बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो.मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती.पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता.फटाक्यांचा माळा वाजत होत्या.ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता.तासभर धिंगाणा सुरूच होता.त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली.झोप लागत नव्हती.भूक लागली होती.उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला "क्या कालू झोपला नाहीस अजून". “अगं बच्चन अजून आला नाही”... असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली.ओठावर दोन ब...
आणि कविता जिवंत राहिली.!
Story

आणि कविता जिवंत राहिली.!

आणि कविता जिवंत राहिली.!आणि कविता जिवंत राहिली... ही माझी वास्तव वादी लिहिलेली कथा व्हॉट्स अप वर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाली..अनेकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या.कौतुक केलं..ही कथा व्हॉट्स अप वर फिरत फिरत जळगाव जिल्ह्यातील एका डॉक्टर असलेल्या ताईंच्या व्हॉट्स अप वर गेली.. त्यांनी ती वेळ काढून शांतपणे वाचली.गंमत अशी झाली होती.गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे मिस्टर आणि त्या दोघेही वेगळे झाले होते.त्यांचे मिस्टर सुध्दा डॉक्टर आहेत.ते पुण्यात असतात.करिअर दोघांच्याही आड येतय आणि इतर काही अडचणी यामुळे त्यांच्यात वाद झाले आणि दोघांनी ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. घटस्फोटासाठी दोघांनीही कोर्टात रीतसर अर्ज केला आहे.त्यांची तारीख सुरू आहे.लवकरात लवकर घटस्फोट घेवून दोघेही वेगळे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.माझी कथा वाचल्यानंतर त्य...
शिंगंकाड्या पुंजाजी
Story

शिंगंकाड्या पुंजाजी

शिंगंकाड्या पुंजाजीपुंज्यानं झाकटीतच तमरेट घेऊन घरामांगचा नाला जोळ केला. दोन मिनीटात तरातरा तमरेट हलवत एका हातात बाभूयची दात घासायसाठी काडी व दुसऱ्या हातात भलामोठा लाकडाचा फाटा वढत वढत तो रस्त्यानं चालला होता. तेवढ्यात त्याले आपल्या घराच्या समोर वाडग्यात बुढीनं वाऊ घातलेल्या पऱ्याटीच्या इंधनाच्या कवट्यावर कुत्रं पाय वर करून मुततांना दिसलं.त्यांन दुरूनच हातात गोटा घेऊन "झऊ लेकाचा लाळ सायाचं तं,तथी आलं सती पळाले " आलेलं कुत्रं त्याच्या अवाजानंच भो-- पयालं. तापावर अंग शेकत बसलेल्या झिंगाजीनं त्याले "जरासक आंगगींग शेकसान की नाही पुंजाजीबुवा" म्हणत हाक मारली."असं म्हणताच दोन मिनिटं तमरेट खाली ठेवत पुंजाजी घडीभर तथीसा थांबला."परसाकडे गेलो होतो दिसलं झोळपं हे,म्हटलं बुढीले सयपाक पाण्याले कामी पळते;कामा- धंद्याच्या गरबळीत बुढीले कायले तरास तीले"असं म्हणताच झिंगाजीनंही मंग न राहवत "लयच गरबळ दिस...
शिक्षक अन कर्तव्य… 
Story

शिक्षक अन कर्तव्य… 

शिक्षक अन कर्तव्य...        बाजारातल्या कोपऱ्यात बसून उम्या आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली. "अरे ही चप्पल शिवायची आहे"      समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली. "तुम्ही चोरगे सर ना?" त्याने विचारलं. "हो.तू?"       "मी उम्या, उमेश कदम.कल्याणी शाळेत दहावी अ च्या वर्गात होतो बघा.तुम्ही आम्हांला इंग्रजी  शिकवायचे."       "बरोबर.पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये" चोरगे  सर त्याला निरखत म्हणाले.       "असू द्या सर.मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन" "पण तू हा व्यवसाय का.....?"        "सर हा आमचा पिढीजात व्यवसाय!आजोबा,वडील दोघंही हेच करायचे.दहावी सुटलो.तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये.त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय." "काय झालं वडिलांना?        "सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय.त्यामु...