आणि कविता जिवंत राहिली.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

आणि कविता जिवंत राहिली.!

आणि कविता जिवंत राहिली… ही माझी वास्तव वादी लिहिलेली कथा व्हॉट्स अप वर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाली..अनेकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या.कौतुक केलं..

ही कथा व्हॉट्स अप वर फिरत फिरत जळगाव जिल्ह्यातील एका डॉक्टर असलेल्या ताईंच्या व्हॉट्स अप वर गेली.. त्यांनी ती वेळ काढून शांतपणे वाचली.गंमत अशी झाली होती.गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे मिस्टर आणि त्या दोघेही वेगळे झाले होते.त्यांचे मिस्टर सुध्दा डॉक्टर आहेत.ते पुण्यात असतात.करिअर दोघांच्याही आड येतय आणि इतर काही अडचणी यामुळे त्यांच्यात वाद झाले आणि दोघांनी ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. घटस्फोटासाठी दोघांनीही कोर्टात रीतसर अर्ज केला आहे.त्यांची तारीख सुरू आहे.लवकरात लवकर घटस्फोट घेवून दोघेही वेगळे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

माझी कथा वाचल्यानंतर त्या खूप रडल्या. ती माझी कथा जशी आहे तशी त्यांनी त्यांच्या नवऱ्याला पाठवली. त्यानेही इतक्या दिवसांनंतर बायकोने काहीतरी आपल्याला पाठवलं आहे म्हणून वेळ काढून त्यांनी ही ती शांतपणे वाचली. आणि ताबडतोब त्यांनी एकमेकांना कॉल केला. दोघानाही ही कथा वाचून जाणीव झाली की, वेगळे होण्यात काहीच अर्थ नाहीय.एकमेकांचा हात धरून संघर्ष करत ही यशस्वी होता येईल.दोघेही बोलता बोलता भावूक झाले.त्यांना हे जानवल की हा एक कवी माणूस आहे.ज्याच्याकडे काहीच नाहीय.पण हा या संघर्षाच्या काळात आपल्या पत्नीला सोबत घेऊन उभा आहे.आणि त्याची पत्नी ही त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढते आहे.. आणि जे यश मिळत आहे ते दोघांचे आहे आणि ते दोघेजण मिळून हे सगळं एन्जॉय करत आहे..

ते दोघेही एकमेकांना बोलत असताना त्या ताईंनी मला कॉल केला.आणि कॉन्फरन्स वर घेतलं. दोघेही अक्षरशः रडून रडून हुंदके देत माझ्याशी बोलले.माझा काहीही सबंध नसताना त्यांनी मला सॉरी म्हणलं.

ते दोघे उद्या पुण्यात एकत्रित येऊन घटस्फोटासाठी केलेला अर्ज मागे घेणार आहेत.जगण्यासाठी नवीन मार्ग काढणार आहेत.परंतु ते वेगळे कधीही होणार नाहीत हा पक्का निर्णय घेऊन मोकळे झाले आहेत.

ते दोघेही माझ्याशी बोलताना मला म्हणाले, ” नितीन दादा आम्ही दोघेही डॉक्टर आहोत.त्या ताई दातांच्या डॉक्टर आहेत. आणि त्यांचे मिस्टर डोळ्याचे डॉक्टर आहेत.त्यांनी मला सांगितलं की, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा आम्ही लवकरच स्वतःचे हॉस्पिटल सुरू करू.आणि त्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला तुम्हाला यावं लागेल.. त्या आधी आम्ही कवठेमहांकाळ मध्ये दोघेही येऊन तुमची भेट घेणार आणि मगच आम्ही आमच्या घरात जाणार.मी ही त्यांना होकार दिला..

ही घटना माझ्यासाठी साधी नाहीय.खूप मोठी आहे.माझ्या लिखाणाला मिळालेला हा जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे असे मी मानतो.

आज वाचन दीन आहे.यानिमित्ताने मी फक्त इतकेच सांगेन.या रिल्सच्या जमान्यात रोज वेळ काढून वाचत चला.माझच वाचा असा माझा हट्ट नाही.कुणाचं ही वाचा पण वाचा जरूर..!

धन्यवाद..!

नितीन चंदनशिवे