एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!
एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!या एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.मला आणि माझ्या कवितेला ही एस.टी.आमच्या आयुष्याला फार जवळची झाली आहे. महाराष्ट्रभर याच एस.टी.ने मी हिंडत असतो. प्रवासात सगळी सर्व सामान्य माझ्यासारखी माणसं असतात. थोडंस सोशल मीडियामुळे मला बरीच सामान्य लोकं ओळखू लागल्यामुळे अनेकजण मी एस.टी.मध्ये किंवा स्टँडवर दिसलो की माझ्यासोबत सेल्फी वगैरे काढतात. कुणी चहा पाजतात. तर कुणी काहीतरी खायला हमखास देतात. याच एस.टी. मध्ये सामान्य लोकांची वेदना समजून घेता येते. मला वाटतं सगळ्या जाती धर्माची माणसं या एस.टी मध्ये भेटतात. पण, खरं सांगू का? या डब्यात फक्त आणि फक्त माणुसकीचा सुगंध दरवळत असतो. बसायला जागा भेटावी, भेटली तर खिडकीजवळ भेटावी या हट्टाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर इथं भांडण होत नाही.ज्याला आधी जागा भेटलेली असते नंतर तोच प्रवासी उभ्या ...









