देवीलाल रौराळे यांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार’ जाहीर
देवीलाल रौराळे यांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार’ जाहीरगौरव प्रकाशन न्यूज अमरावती | प्रतिनिधी : अमरावतीतील प्रसिद्ध गझलकार, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते देवीलाल रौराळे यांना विश्वबंधुता साहित्य परिषद, पुणे तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार येत्या २ जून रोजी पुणे येथील एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नविपेठ येथे आयोजित भव्य विश्वबंधुता कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.देवीलाल रौराळे हे अमरावतीचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ते राईटवे फाउंडेशनचे अध्यक्ष असून सामाजिक, साहित्यिक तसेच व्यसनमुक्ती चळवळीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. गझल लेखनासोबतच उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ‘देवी...
