म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे.!
म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे.!Article : मी पणा अंगात आल्यानंतर ICU ची रूम बघावी आणि विचार करावा.. जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आय.सी.यु! दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते. तुमचा धर्म,जात,वर्ण, श्रीमंत,गरीब...एवढंच नाही तर निसर्गाने तयार केलेला स्त्री-पुरुष हा भेदही इथं नसतो! तो काचेचा दरवाजा ओलांडून मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडता तिथेच गळून पडतात.मध्ये फक्त मानवी शरीर जातं!
आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरू असतील... पण जो अर्थ ,जे तत्वज्ञान इथं आय.सी.यु.मध्ये मिळतं,ते कुठेच वाचायला मिळत नाही! आयुष्याचा अर्थ कळतो!
म्हणूनच ही जागा फार सुंदर आहे.एखाद्या घरात भुताटकी असते,कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर, मोठ्या झाडाखाली अ...








