गोपाया शिंपी
गोपाया शिंपीप्रत्येक गावात एखादी तरी वल्ली असतेच. माझ्याही गावात एक अशीच वल्ली होती . तिचे नाव गोपाळराव तल्हार . पण गावातील सारेच त्यांना गोपाया शिपी म्हणूनच ओळखायचे. म्हणजे गोपाळा शिंपी. ह्यांच्या विषयी बऱ्याच दंतकथा लोक सांगत. कधी गोपाळराव स्वत:च सांगत असत . एकदा म्हणे ते पेट्रोमॅक्स घेऊन प्रातर्विधीसाठी गेले होते. तर कधी शंभराच्या नोटांच्या जाळावर चहा करुन प्याल्याचेही अनेकजण सांगत . मांसाहारी जेवणात लिंबू नसले तर तटावरून उठून तसेच चारपाच कोसावर ते लिंबू आणायला जात . अशा एक ना अनेक दंतकथा. खरंतर त्यांचे वडील त्याकाळात शिक्षक होते म्हणतात.घरची परिस्थितीही उत्तम. पण गोपाळराव निघाले दिवटे. उधळे आणि बांड. साहजिकच बापासोबत खटके उडू लागले. आणि मग एका काळ्यारात्री त्यांनी सरळ बापाचे तुकडे केले व पोत्यात भरून दूर गावाबाहेर नेऊन टाकले. दुसऱ्या दिवशी गावात हलकल्लोळ. बरं ही सत्यघटना मी स्वत: त...









