गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा.?
गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा..? सांगणारी एक अप्रतिम कादंबरी ...वचपा.!प्रतिभावंत ज्येष्ठ साहित्यिक एम.आर.राठोड (से. नि. गटशिक्षणाधिकारी ) लिखित वचपा कादंबरी दमाळ प्रकाशन संस्थेमार्फत विकत घेऊन वाचून काढलो.सदर कादंबरी वीस भागात विभालेली असून एकूण 213 पृष्ठात सामावलेली आहे.सात दिवसांत कादंबरी वाचून काढली. कादंबरी संदर्भात दोन शब्द लिहावं अशी माझी इच्छा झाली. एम.आर.राठोड साहेबांना सुध्दा माझ्याकडून हीच अपेक्षा होती.खर तर साहित्य समृद्धीच्या अनुषंगाने साहित्याची समीक्षा होत राहण गरजेचे असते.साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांकडून समिक्षा झाली पाहिजे अशी बहुतांश लेखकाची इच्छा असते.माझं तर साहित्य क्षेत्रात आता कुठ पदार्पण आहे; तरी देखिल एम.आर.राठोड सरांनी मला कादंबरीविषयी दोन शब्द लिहशिल असं सांगणं खरोखरच माझ्या छोट्याशा साहित्य प्रवासातला हा एक प्रेरक तसेच आव्हानात्मक अनुभव आहे.आता...









