अस्तित्व गमावलेली माणसे : नवी उमेदाची ऊर्जा देणारी कविता
महेंद्र गायकवाड हे दोन दशकापासून आंबेडकरी कवितेच्या प्रांतात नित्यनेमाने कविता लिहित आहेत. त्यांची राहणी साधी असली तरी कवितेचे शब्द क्रांतीध्वज उंचावणारी आहेत. नुकताच त्यांचा अस्तित्व गमावलेली माणसे हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...! आंबेडकरी कविता ही क्रांतीच्या ठिणग्या निर्माण करणारी आहे. ही कविता शोषणाच्या सार्या मुळांना उघडून फेकते.आंबेडकरी कवी आपल्या मर्म चिंतनातून समाजाचा वेध घेत असतो. कविता ही समाजाला नवे वास्तव सांगत असते. आपले हित व अहीत यांची चर्चा करते.
आंबेडकरी कवितेत काही कवी सोडले तर बाकीचे कवी हे आपले निरंतरतत्व सोडून बसले आहेत .पण काही कवी अजूनही सूर्यदीपत्वाची नवी ऊर्जा पेरत आहेत. त्यात महेंद्र गायकवाड हे सातत्याने समाजाला सजग करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या दारिद्र्याला ते गोंजारत नाही. आपली समस्याने ते मोडत नाही. तर ते समूह मनाची व्य...







