Monday, October 27

Tag:

बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा 
Article

बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा 

गोरबंजारा अकादमी : बंजारा भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी ऐतिहासिक ठेवा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून बंजारा साहित्य, संस्कृती व कला ही भारतीय विविधतेला समृद्ध करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बंजारा लोकसाहित्य टिकून आहे. बंजारा भाषिकांची संख्याही राज्यात मोठयाप्रमाणात आहे. राज्यात सिंधी, ऊर्दू,  गुजराती अकादमी स्थापन केल्या गेली, परंतु बहुसंख्येने असलेल्या व समृद्ध लोकसाहित्य व संस्कृती असणाऱ्या बंजारा भाषिकांसाठी अकादमी नसल्याची वेदना प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार यांनी पुसद येथील एका बैठकीत बोलून दाखवली होती. त्यासाठी साहित्य संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्याचे त्याचवेळी ठरविण्यात आले.  बंजारा साहित्य संस्कृती व कलेसाठी एक शाश्वत मंच असावे. भारतीय विविधतेत इतर भाषिकासह सुसंवाद साधत बं...
अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्ड
Article

अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्ड

अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्डअनाथांचा बाप होणे सोपे काम नाही.सामान्य मुलांना जेथे सांभाळणे कठीण काम तेथे बेवारस सापडलेल्या अनाथ,मूक बधीर ,दिव्यांग,गतिमंद मुलांना सांभाळण्याचे काम शंकरबाबा अविरत करीत आहे.बाबा कोणत्याही पुरस्काराचे भुकेले नसले तरी बाबांच्या वझ्झर मॉडेलची योग्य ती दखल भारत सरकारने घेऊन त्यांना सामाजिक क्षेत्रातला 'पद्मश्री' सन्मान घोषित केला त्यामुळे बाबांच्या चाहत्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे.तसाच तो मलाही झाला आहे म्हणून बाबांचे मनापासून अभिनंदन.वझ्झर येथील शंकरबाबांची व त्यांच्या मुलांची दिनचर्या बघितली तरी नकळत तोंडात बोट जाते.त्या दिनचर्येची आपण फक्त कल्पनाच करु शकतो.अगदी संगणकीय प्रणालीसारखे तेथे काम चालत असते.अर्थात त्याचे सर्वच श्रेय बाबांना जाते.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदावझ्झरच्या आश्रमातील बाबांच्या ह...
कष्टक-यांच्या जखमेवर गुणकारी  व व्यवस्थेला उबजणारा विजय ढालेचा ‘बिब्बा’
Article

कष्टक-यांच्या जखमेवर गुणकारी व व्यवस्थेला उबजणारा विजय ढालेचा ‘बिब्बा’

कष्टक-यांच्या जखमेवर गुणकारी व व्यवस्थेला उबजणारा विजय ढालेचा 'बिब्बा'------------------------------------"किती बांधू मी पडाय खांडकाले काळ्या बिब्ब्याचं रोग निदान ज्यानं केलं तो वैद आजारी होता ! " 'बिबा' हे औषधी गुणयुक्त व त्याचे फुल आणि गोळंबी खाण्यासाठी उपयोगात पडणारे जंगली फळ आहे. हा एक प्रकारचा रानमेवा आहे. पण या फळाचा काळ्या रंगाचा भाग (बिबा) हा गावाकडील कष्टकरी, शेतकरी लोक तळपायाला जर काटा रुतला, काडी रुतली, कापलं तर त्या जखमेवर जाळावर गरम करून त्याच्या तेलाचा चरका (चटका किंवा डागणी) देतात. बिब्याचं पडयही बांधतात. त्यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते व वेदनाही कमी होते. कवी विजय ढाले हा शेतकरी, कष्टकरी आहे. त्याला याचा वापर कसा व कुठे करायचा ? याचे ज्ञान आहे. आणि म्हणूनच त्याने कवितासंग्रहाचे शिर्षक बिब्बा असे वापरले असावे. तो त्याकडे प्रतीक म्हणून बघत असावा. पुर्वीपासून ये...
महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
Article

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा विद्येविना मति गेली |मतिविना निती गेली ||नितिविना गति गेली |गतिविना वित्त गेले ||वित्ताविना शुद्र खचले |इतके अनर्थ एका अविद्येने केले || या भुतलावर जन्मलेल्या माणसाजवळ जर शिक्षण नसेल, तर माणसाची काय अवस्था होते. याचं मार्मिक सत्य ज्योतिबांनी सांगितलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिकलं पाहिजे.हा ज्योतीबांचा ध्यास होता.आणि यासाठीच महात्मा फुलेंनी शिक्षणाची चळवळ उभी केली.महात्मा फुलेंचा हा परिवर्तनवादी विचार समाजाला शिकण्याची प्रेरणा देऊन जात आहे. भारतीय स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना संबोधले जाते. त्याकाळामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीकरिता चालविलेल्या शाळा या काळात अस्तित्वात होत्या.पण बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करावी हे ध्येय मात्र त्यांचे नव्ह...