स्त्री शिक्षणाचे प्रणेते – महात्मा फुले
स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा फुले
_________________________
अंधश्रद्धेला कट्टर विरोध करणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ,संस्कारपीठ होते. त्यांनी भारतीय समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा समूह नष्ट करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ते नेहमी बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून आपले कार्य करत होतेमहाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यात महात्मा फुलेंची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. स्त्री शिक्षणाचे मूर्तमेढ रोवणारा आद्य क्रांतिकारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा 1848 साली पुणे येथे भिडे यांच्या वाड्यात काढली. ते उत्कृष्ट मराठी लेखक, विचारवंत व समाज सुधारक ह...





