Sunday, October 26

Tag: #मराठी लेख

बायको म्हणजे कोण?
Article

बायको म्हणजे कोण?

बायको म्हणजे कोण? बायको ह्या शब्दाला जर फोडले तर “बा” म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी “य” म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि “को” म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी ! सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात! मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल. ● हे वाचा –मी भारत माता बोलतेय बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच मैत्रीण सापडली तर तिला आणखी काय हवं ! प्रत्येक नवऱ्याला वाटत बायकोसाठी खूप काही करावं लागतं पण सत्य परिस्थिती अशी असते तिला लागते नवऱ्याची साथ! हातात भक्कम हात!!! समजून घेणार हृदय ! इतकं प्रेम कि तिला माहेरच्या लोकांची आठवण हि ना यावी ! एक जवळचा मित्र !!! आणि जो अहंकार बाजूला ठेवून तिच्याशी वागेल...
ग्रामीण भागातील चुलीवरची भाकर
Article

ग्रामीण भागातील चुलीवरची भाकर

ग्रामीण भागातील चुलीवरची भाकरभारतीय ग्रामीण संस्कृतीत चुलीवरची भाकर एक अत्यंत महत्त्वाची स्थान आहे. ही भाकर केवळ आहाराचा भाग नाही तर ती एक सांस्कृतिक प्रतीक आहे. ग्रामीण भागात, घराघरात चुलीवर भाकर तयार करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे स्थानिकता, साधेपणा आणि शेतकरी जीवनशैलीचे दर्शन होते.भाकर बनवण्याची प्रक्रिया : भाकर बनवण्यासाठी साधारणतः ज्वारीचे पीठ,गरम पाणी आणि थोडे मीठ लागते. कडवट तापलेल्या चुलीवर ओल्या हातांनी पीठ गूंठले जाते आणि नंतर त्याची गोळे करून थापली जाते. चुलीत आग लागल्यानंतर, भाकरी तोंडावर ठेवली जाते. ही प्रक्रिया साधी असली तरीही तिच्यामागे अनेक कौशल्ये आणि अनुभव दडलेले असतात.चुलीचं महत्त्व : चुलीवरची भाकर तयार करताना ज्या चुलीचा वापर केला जातो, ती ग्रामीण जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. चुलीवर जेव्हा भाकरी तयार केली जाते तेंव्हा तिच्यातून येणारा सुवास, थर्मल ऊर्जा आणि तापमाना...
नवरात्र आणि रंग
Article

नवरात्र आणि रंग

नवरात्र आणि रंगनेहमीप्रमाणेच कार्यालयात जेवणाच्या सुट्टीत आमच्या गप्पागोष्टी चालल्या असताना एकसारख्या साड्या घेण्याचा विषय निघाला. साडी म्हणजे प्रत्येकीचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग काय विचारता साड्यांचे अनेक प्रकार आहेत. मग कोणता प्रकार,कोणता रंग , घ्यायचा याबाबत चर्चेला उधाण आले. नवरात्रीतील नवरंगाच्या साड्यापर्यंत चर्चा येऊन थांबली.नवरात्रीला त्याच रंगाच्या साड्या का घालायच्या? याच्यामागे काय कारण आहे? कुणी ठरवले हे रंग ? याच्यामागे काही अध्यात्मिक कारण आहे का ? याचा विचार न करता आपण एखादी गोष्ट किती सहजपणे अध्यात्माशी जोडतो आणि नकळतच त्याचे पालन करू लागतो. त्या गोष्टीसाठी किती आग्रही होतो याचा कुठे विचार होत नसल्याचे दिसून येते.हे वाचा – नाट्यप्रेमी करजगावएका दैनिकाने खप वाढविण्यासाठी 2003 मध्ये त्यांनी वापरलेली ही एक मार्केटिंग स्ट्रेटजी होती. यासाठी त्यांनी श्रीकृष्णनीतीचा...
भारतामध्ये पहिली मोटार बस सेवा मुंबईत
Article

भारतामध्ये पहिली मोटार बस सेवा मुंबईत

भारतामध्ये पहिली मोटार बस सेवा मुंबईत.!भारतामध्ये पहिली मोटार बस सेवा मुंबईत (त्यावेळच्या बॉम्बेमध्ये) १५ जुलै १९२६ रोजी सुरू झाली. ही ऐतिहासिक बस सेवा कोलाब्याच्या अफगाण चर्च येथून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत चालत होती, ज्याचे अंतर अंदाजे १० किलोमीटर होते. यासोबतच भारतातील सार्वजनिक बस परिवहनाची सुरूवात झाली. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) या संस्थेने ही सेवा सुरू केली होती. सुरुवातीला काही सिंगल-डेकर बसेसच होत्या, पण या सेवेला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे हळूहळू तिचा विस्तार झाला.हे वाचा – धामंत्री येथील प्राचीन शिवमंदिरतुम्हाला बेस्ट किंवा भारतातील सार्वजनिक परिवहनाच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती हवी आहे का?...
भाड्याची सायकल..!
Article

भाड्याची सायकल..!

भाड्याची सायकल...!१९८०-९० चा काळ होता तो...त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो... बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते...भाड्याचे नियम कडक असायचे जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी...मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो.आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.हे वाचा – अनाथांची नाथ बोहणी.!भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची...तेव्हा भाड्याने...
माणुसकीचा ओलावा कमी झाला.!
Article

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!बदल, आपण बरेचदा बोलुन जातो की अमका फार बदलला, तमका फार बदलला, अमका लग्नानंतर फार बदलला, माणसा माणसा मधे काळानुसार, त्या त्या वेळेनुसार बदल घडुन येतात, ऋतु बदलतात तशी काही माणसं पण बदलतात, त्यांचे स्वभाव बदलतात, गाव बदलतात, शहर बदलतात, जग बदलत चाललंय, मी बदललो असेन, तुम्ही बदलला असाल. काळानुसार लाईफ स्टाईल बदलत चाललीय. संडास ते शौचालय ते टॉयलेट ते वॉशरूम असा हा शब्दरूपी बदल अन् मोरी ते बाथरूम हा शब्दरूपी बदल नकळत घडून आला. पूर्वी मोरी वेगळी असायची अन् संडास वेगळे असायचे, आता दोघांना एकत्रित करून ते washroom झाले, केवढा हा बदल. हल्ली "संडास" शब्द उच्चारायला माणसं कचरतात, तो रांगडा शब्द वाटतो, त्या ऐवजी टॉयलेट / वॉशरूम हे सभ्य शब्द वाटतात म्हणुन त्यांची चलती जास्त आहे.शहरीकरण झाल्यानंतरचे एकंदरीत बदल आधुनिक सुख सोयी तर देतात पण एकंदरीत वाट पण लावून जातात असच म्हण...
मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणूस जन्माला येतो तेव्हा तो एक पवित्र जीव असतो. त्या पवित्र जीवावर लहान वयात सर्वच जाती धर्माचे प्रेम करतात. जेव्हा सर्व धर्माचे जातीचे त्या पवित्र लहान जीवाचे लाड पुरवतात तेव्हा त्या पवित्र जीवाला हे संपूर्ण विश्व किती चांगले आहे आणि किती चांगले लोकं आहेत हे त्याला वाटू लागतं.  परंतु तो जसा जसा मोठा होतो तस तसे त्यावर समाजाचे संस्कार होत असतात. त्याला लहानपणीचा अनुभव व मोठे होण्याचा अनुभव हा वेगळा जाणवत असतो. अशाच ह्या माणसाच्या जीवन चक्रातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मा पासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावे लागले. काय वाटले असेल त्या कोमल जीवाला. एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय. परंतु शिकवण ही झाली होती की सर्व लेकरं देवा समान. सर्व लेकरं दे...
करजगावचे  संघर्षशील  व्यक्तिमत्व : सतीश दवणे
Article

करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे

करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे "अच्छे ने अच्छा, और बुरे ने बुरा जाना मुझे, क्योंकी जिसकी जितनी जरुरत थी, उसने उतनाही पहचाना मुझे"ओल्या रांजणाचा काठ कुंभार जितक्या सहजतेने वळवू शकतो, मातीच्या ओल्या गोळ्याला जसा आकार देवू शकतो तेवढ्याच सहजतेने परिस्थितीवर स्वामित्व ठेवून तो ती बदलू शकतो, हवी तशी अनकुल करुन घेऊ शकतो हे सर्व तो त्यांच्या सुप्त व प्रकट सामर्थ्यांच्या, चारित्र्य संपन्नतेच्या, विचाराच्या, सत्कर्माच्या आणि पुरूषार्थाच्या जोरावर साध्य करतो. त्याच्या मनात असणाऱ्या तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या साध्यास साध्य, सिद्ध करू शकतो. गरींबी, अवहेलना व अपमान, अवतीभवतीची स्थिती, घरच्या पिंजलेल्या भूकेभोवती पिंगा घातलेल्या यातना यातून मनात जिद्द, इच्छाशक्ती पेटून ऊठते व जीवनाचे इप्सित साध्य करण्यासाठी कष्टाची तयारी मनात ठेवून जो वाटचाल करतो तो आपल्या ध्येयसिध्दीपर्यंत पोहचतो ह...